शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'हे' असणार विधानसभेसाठी भाजपाचं घोषवाक्य; रावसाहेब दानवेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 19:52 IST

काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला असून 18 राज्यात काँग्रेस हद्दपार झाली आहे. राज्यात राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे...

ठळक मुद्देराज्यभरात काढणार यात्रा

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली असून  ‘दिसतोय फरक... शिवशाही परत’ हा नारा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच राज्यभरात यात्रा काढण्यात येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्यावतीने शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात शनिवारी केली. त्यानिमित्त दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार दिलीप कांबळे, जगदीश मुळीक, शहर सरचिटणीस दीपक मिसाळ, नगरसेवक मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. यावेळी दानवे म्हणाले, 1972 नंतर दुसऱ्यांदा बिगर काँग्रेसी सरकार सत्तेत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे चोख नियोजन यामुळे लोकसभेला यश मिळाले. काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला असून 18 राज्यात काँग्रेस हद्दपार झाली आहे. राज्यात राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे. लोकसभा निवडणूका जिंकल्यानंतर आता आम्ही विधानसभेची तयारी सुरु केली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात येत असून राज्यभरात विविध उपक्रम आगामी काळात राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना दानवे म्हणाले,यापुर्वी मिळालेल्या यशापेक्षा अधिक यश विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवू. राज्यात ज्या ज्या ठिकाणी कॉंग्रेस मजबूत अवस्थेत आहे तेथे विशेष लक्ष केंद्रित करुन तेथूनही कॉंग्रेसला हद्दपार करणात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेचे संपादन, मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची तयारी या सरकारच्या जमेच्या बाजू असून काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरकारपेक्षा आम्ही दिलेल्या आश्वासनांची पुर्ती मोठ्या प्रमाणावर केल्याचे दानवे म्हणाले.15 ऑक्टोबर 2014 रोजी विधानसभेच्या निवडणूका झाल्या होत्या. तीच ‘कट ऑफ डेट’ डोळ्यासमोर ठेवून विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीचे नियोजन केले आहे. 15 ऑक्टोबरपर्यंतचे पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. प्रदेश कार्यकारिणी बैठकीसोबतच शक्ती केंद्रांचे कार्यक्रम, नव मतदार नोंदणी, महिलांसाठी विशेष कार्यक्रम, रक्षाबंधन, महिलांशी संवाद मेळावे, विस्तारक योजना असे कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. सदस्य नोंदणी अभियान पूर्ण झाल्यानंतर कार्यकारिणीमध्ये फेरबदल होणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेRavsaheb Khevereरावसाहेब खेवरेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक