शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

लोणीकरांची शैक्षणिक पात्रता वादात!

By admin | Updated: June 11, 2015 09:13 IST

दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांचे बोगस डिग्रीचे प्रकरण गाजत असताना महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचीही शैक्षणिक पात्रता

मुंबई : दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांचे बोगस डिग्रीचे प्रकरण गाजत असताना महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचीही शैक्षणिक पात्रता वादात सापडली आहे. लोणीकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीत तफावत दिसत असल्याने त्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. परतूर (जि.जालना) विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले लोणीकर यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या शैक्षणिक पात्रतेविषयी वेगवेगळी माहिती नमूद केलेली दिसते. २००४ आणि २००९ च्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए प्रथम वर्ष केल्याचे म्हटले होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपण केवळ पाचवी उत्तीर्ण असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. अगोदरच्या निवडणुकीत पदवीधर असलेले लोणीकर नंतरच्या निवडणुकीत केवळ पाचवी उतीर्ण कसे, असा सवाल प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रपरिषदेत केला. विशेष म्हणजे, लोणीकर यांनी आपल्या वेबसाईटवर ते बीए असल्याची आणखी माहिती दिली आहे. लोणीकर यांचे शिक्षण इयत्ता चौथीपर्यंतच झालेले आहे. परतूर तालुक्यातील लोणी खुर्द या त्यांच्या मुळ गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोणीकर यांनी हे शिक्षण घेतले. (विशेष प्रतिनिधी)