लोणावळा : सेल्फी काढताना दरीत पडून युवक ठार

By Admin | Updated: October 8, 2016 18:06 IST2016-10-08T18:04:19+5:302016-10-08T18:06:06+5:30

लायन्स पाँईट येथील दरीच्या तोंडावर सेल्फी काढताना पाय घसरुन दरीत पडल्याने एक २५ वर्षीय युवक ठार झाला.

Lonavla: Youth killed after killing Selfi | लोणावळा : सेल्फी काढताना दरीत पडून युवक ठार

लोणावळा : सेल्फी काढताना दरीत पडून युवक ठार

>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. ८ -  लायन्स पाँईट येथील दरीच्या तोंडावर सेल्फी काढताना पाय घसरुन दरीत पडल्याने एक २५ वर्षीय युवक ठार झाला. आज दुपारी २:१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अँग्नेल सिरिल पेरिस (वय - २५, रा. कलिना, ठाणे) असे या मयत युवकाचे नाव आहे. 
कलिना ठाणे येथील ४ युवक आज दुपारी लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारी सव्वादोनच्या सुमारास सुरक्षा कठडा ओलांडत दरीच्या तोंडावर धोकादायक रित्या सेल्फी काढण्याच्या नादात अँग्नेल याचा  पाय घसरुन तोल गेल्याने तो दरीत जवळपास अडीचशे फुट खोल पडल्याने त्यांचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग मित्र अँडव्हेंचर क्लबचे सदस्य सुनिल गायकवाड, अजय राऊत, राजेंद्र कडू, ब्रिजेस ठाकूर, प्रणय अंभोरे, रोहित वर्तक, योगेश उंबरे, वैभव राऊत, अनुराग यादव, अजय शेलार, विकी मावकर, मधुर मुंगसे, महेश म्हसणे, कपिल दळवी घटनास्थळी पोहचले. शिवदुर्गच्या सदस्यांनी रोपच्या सहाय्याने दरीत उतरत शोध घेतला असता अँग्नेलचा मृतदेह खोल अंतरावर आढळून आला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Lonavla: Youth killed after killing Selfi