शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 16:56 IST

loksabha Election Result - लोकसभा निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी बैठका सुरू केल्या आहेत. आज शिवसेना भवनात आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. 

मुंबई - महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्रित ताकदीनं लढू. परंतु २८८ मतदारसंघात संघटनात्मक बांधणीसाठी ताकदीनं कामाला लागा असा आदेश माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना दिले आहेत. 

शिवसेना भवन येथे आज जिल्हाप्रमुख, प्रमुख नेते, आमदार, खासदारांची बैठक उद्धव ठाकरेंनी घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि येणाऱ्या निवडणुकीतील तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही विधानसभा निवडणूक लढू आणि महाराष्ट्राची सत्ता काबीज करू. परंतु ते करत असतानाच संघटना बळकटीच्या दृष्टीने २८८ मतदारसंघात आज आहे त्यापेक्षा अधिक मजबूत करण्यासाठी कामाला लागा असं जिल्हाप्रमुखांना पक्षप्रमुखांनी आदेश दिलेत. एखादी विधानसभा आम्ही लढू किंवा नाही परंतु त्याठिकाणी २८८ मतदारसंघात संघटना जिद्दीने उभी राहिली पाहिजे असं बैठकीत ठरलं आहे. 

तसेच ज्या महाविकास आघाडीने एकत्रितपणे भाजपाला दिल्लीत बहुमतमुक्त केले, तीच महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुन्हा एकत्रितपणे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ताकदीने विधानसभा जागा लढू आणि १८० ते १८५ जागा महाराष्ट्रात जिंकू असा निर्धार शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला. विधानसभेच्या दृष्टीने संघटना बांधणीसाठी पावसाळा असला तरी उद्धव ठाकरे मेळावे आणि सभेचं आयोजन करण्यात येत आहे. लवकरच त्याबाबत तारखा जाहीर करू असं सांगत संजय राऊतांनी मविआतच विधानसभा लढणार असल्याचं स्पष्ट केले. 

दरम्यान, आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाप्रमुख, प्रमुख नेते, आमदार, खासदार यांची बैठक झाली. मुंबईचे विभागप्रमुखही होते. संघटना बांधणीवर जोर देण्याबाबत चर्चा झाली. आम्ही विधानसभा निवडणूक ताकदीने लढू. २८८ मतदारसंघात संघटना बांधणी होणं गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक, पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका असतील त्याबाबतचा तयारीचा आढावाही आजच्या बैठकीत घेण्यात आला. भाजपा आणि त्यांच्या इतर मित्रमंडळींना आम्ही रोखलं आहे. नरेंद्र मोदींचं बहुमत खाली आणण्यात, भाजपाला बहुमतमुक्त करण्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं योगदान मोठे आहे असा टोला संजय राऊतांनी भाजपाला लगावला आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीvidhan sabhaविधानसभा