शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

आघाडी धर्म पाळा, अजूनही वेळ गेली नाही; ठाकरेंच्या उमेदवार यादीवर काँग्रेस नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 1:00 PM

Congress vs Uddhav Thackeray: ठाकरेंची उमेदवार यादी जाहीर होताच काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली असून उद्धव ठाकरेंनी फेरविचार करावा अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.

मुंबई - Congress Upset on Uddhav Thackeray ( Marathi News ) महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच यादी जाहीर होईल असं वारंवार संजय राऊतांकडून सांगण्यात येत होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या गटाने पहिली यादी जाहीर केली. त्यात सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यावरून आता काँग्रेसनं उघडपणे नाराजी व्यक्त करत अजूनही वेळ गेली नाही असं विधान केले आहे. 

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भाने चर्चेमध्ये आहोत, काँग्रेसची त्या जागांचा बाबत आग्रही मागणी आहे, अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही, असे असतानाही त्या जागांवरून उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही. आघाडी धर्माचे पालन सगळ्यांनीच केले पाहिजे असं माझे मत असून अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. 

तर महाविकास आघाडीचा जागावाटप चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी दोन जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. आघाडी धर्म पाळला असता तर बरे झाले असते. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित करणे हे आघाडी धर्माला गालबोट लागले, यावर त्यांनी पुनर्विचार करावा असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

ठाकरे गटाकडून जाहीर झालेले १७ उमेदवार

बुलढाणा - नरेंद्र खेडेकरयवतमाळ-वाशिम - संजय देशमुखमावळ - संजोग वाघेरे-पाटीलसांगली - चंद्रहार पाटीलहिंगोली - नागेश पाटील आष्टीकरछत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरेधाराशिव - ओमराजे निंबाळकरशिर्डी- भाऊसाहेब वाघचौरेनाशिक - राजाभाई वाजेरायगड - अनंत गीतेसिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊतठाणे - राजन विचारेमुंबई-ईशान्य - संजय दिना पाटीलमुंबई-दक्षिण - अरविंद सावंतमुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकरपरभणी - संजय जाधवमुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस