LMOTY 2025: 'डीसीएम झाल्याची मला नाही खंत, पण अचानक शांत झाले का जयंत'; एकनाथ शिंदेंची टोलेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 21:11 IST2025-03-19T21:07:14+5:302025-03-19T21:11:52+5:30
Eknath Shinde on Jayant Patil: आज मुंबईत 'लोकमत'च्या महासोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महामुलाखत घेतली.

LMOTY 2025: 'डीसीएम झाल्याची मला नाही खंत, पण अचानक शांत झाले का जयंत'; एकनाथ शिंदेंची टोलेबाजी
Maharashtra Politics ( Marathi News ) : आज मुंबईत 'लोकमत'च्या महासोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महामुलाखत घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना टोले लगावले. 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावरुन उपमुख्यमंत्री होऊन ॲडजस्ट झाले का?, असा प्रश्न विचारत पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला.
LMOTY 2025: जयंत पाटलांनी विचारले 'वर्षा'वर रहायला कधी जाणार? देवेंद्र फडणवीसांनी तारीखच सांगितली
दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार जयंत पाटील यांना डिवचले. बोलताना शिंदे म्हणाले, आम्हीजो उठाव केला त्याला काही कारण होतं. तुम्ही फडणवीसांना हुडी घातली म्हणाला. पण त्यामुळे बऱ्याच लोकांना हुडहुडी भरली आहे.
"जयंतराव तुम्ही मुलाखतीमध्ये म्हणाला की एक नंबरचे दोन नंबर झाले. पण तसं काही नाही. तु्म्ही प्रश्न विचारण्याच्या बाजूने आहात, मला वाटत होतंतुम्ही उत्तर देण्याच्या बाजूने असाल, असा टोलाही शिंदे यांनी जयंत पाटील यांना लगावला. मी सीएम होतो तेव्हा स्वत:ला कॉमन मॅन समजत होतो. आता मी डीसीएम आहे तरी सुद्धा स्वत:ला डेडीकेटेड टू कॉमन मॅन समजतो. त्यामुळे डीसीएम झाल्याची नाही मला खंत पण अचानक शांत झाले का जयंत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांना लगावला.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी अॅडजस्ट झाले का?
यावेळी मुलाखतीमध्ये जयंत पाटील म्हणाले, काही लोकांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री होण्याची सवय असते. तुम्ही(देवेंद्र फडणवीस) मुख्यमंत्री होता, पुढे उपमुख्यमंत्री म्हणून अॅडजस्ट झालात. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होऊन अॅडजस्ट झाले का?
या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'मला कळतंय की, तुम्ही(जयंत पाटील) जो तीर सोडलाय की, काही लोकांना उपमुख्यमंत्री होण्याची सवय असते, तो अजितदादांच्या नावाने सोडलाय. अजितदादा उपमुख्यमंत्रीपदाचे रेकॉर्ड मोडणार आहेत. काही लोक त्यांना कायम उपमुख्यमंत्री म्हणतात. ते कायम उपमुख्यमंत्री राहावे असं काही नाही, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत,' असं फडणवीस म्हणाले.