लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 - ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींच्या’ गौरव सोहळ्याला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 09:15 PM2017-11-14T21:15:31+5:302017-11-14T21:21:29+5:30

महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा दैनिक लोकमतकडून गौरव करण्यात येत आहे. या पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे पुष्प असून महाराष्ट्राचा मोस्ट स्टायलिश कोण हे आज ठरणार आहे.

Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017 - Beginning of 'Most Stylish Celebrities' Gala Jubilee | लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 - ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींच्या’ गौरव सोहळ्याला सुरुवात

लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 - ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींच्या’ गौरव सोहळ्याला सुरुवात

Next

मुंबई : महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा दैनिक लोकमतकडून गौरव करण्यात येत आहे. या पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे पुष्प असून महाराष्ट्राचा मोस्ट स्टायलिश कोण हे आज ठरणार आहे. साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती.  मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. 

सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती आहे. लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्याचे प्रोगेस पार्टनर कार्लटन, स्टार कॉस्मेटिक्स, जॉनी वॉकर तसेच झूम ,पिंक व्हिला, अफॅक्स आणि झी मराठी पार्टनर आहे.

या सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास आहे. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टाइलिश पर्सनालिटीजलाच या पुरस्काराचे मानकरी होता येत आहे. या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभली आहे. 

'मराठी इंडस्ट्री स्टायलिस्ट झाली आहे, त्याचा सन्मान होतो हे महत्त्वाचं. लोकमतच्या या पुरस्काराला यायला मिळणं भाग्य आहे', अशी प्रतिक्रिया अभिनेता भूषण प्रधानने दिली आहे. तर अभिनेत्री सई ताम्हणकरने आनंद वाटतो हे प्लॅटफॉर्म तयार केलं. लोकमतच्या या कामाचं कौतुक आहे असं सांगितलं आहे. 
 

ट्रॉफीही स्टायलिश
महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश लोकांना गौरवान्वित करण्यासाठी तशीच स्टायलिश ट्रॉफीही यंदा तयार करण्यात आली आहे. स्टायलिश महिला असो वा स्टायलिश पुरुष, दोघांचाही गौरव करण्यासाठी ही ट्रॉफी तयार करताना विचार करण्यात आला आहे. एका बाजूला लावण्य रुपी महिला तर मागच्या बाजूला बलदंड पुरूष साकारून डिझाइनचा एक नवा स्टायलिश आदर्श नमुनाच या निमित्ताने तयार करण्यात आला आहे़ अशा प्रकारची ट्रॉफी यापूर्वी कधीच तयार झाली नाही.
 

Web Title: Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017 - Beginning of 'Most Stylish Celebrities' Gala Jubilee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.