शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर यांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव’ पुरस्कार, राज्य सरकारचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:08 IST

Journalist Awards 2025: विजय बाविस्कर यांच्या ‘लोकमत’मधील ४० वर्षांच्या अविरत सेवेचा गौरव राज्य सरकारने यानिमित्ताने केला आहे.

मुंबई : ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर यांना राज्य सरकारचा ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. बाविस्कर यांच्या ‘लोकमत’मधील ४० वर्षांच्या अविरत सेवेचा गौरव राज्य सरकारने यानिमित्ताने केला आहे.

यासोबतच राही भिडे- २०१९, सुधीर पाठक- २०२०, भाऊ तोरसेकर- २०२१, बाळासाहेब जाधव- २०२३ या ज्येष्ठ पत्रकारांनाही जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. बाविस्कर यांना २०२२च्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

विजय बाविस्कर हे गेली ४० वर्षे ‘लोकमत’मध्ये कार्यरत असून  प्रशिक्षणार्थी  उपसंपादक ते समूह संपादक, असा त्यांचा प्रवास राहिला आहे. बाविस्कर यांना ‘लोकमत अचिव्हर्स अवॉर्ड्स २०२४-२५’अंतर्गत अलीकडेच ‘लोकमत जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

‘लोकमत’चा चौफेर गौरव : राज्य सरकारने पत्रकारांसाठीच्या २०१९, २०२०, २०२१, २०२२ आणि २०२३ मधील राज्य आणि विभागीय पुरस्कारांचीही मंगळवारी घोषणा केली. पुरस्कार विजेत्यांमध्ये ‘लोकमत’च्या विविध आवृत्त्यांमधील सहकाऱ्यांचा समावेश आहे. 

सर्वोत्कृष्ट अग्रलेखासाठीचा सुधाकरराव डोईफोडे पुरस्कार- २०२२ (५१ हजार रुपये) लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने यांना जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट छायाचित्रासाठीचा राज्यस्तरीय तोलाराम कुकरेजा पुरस्कार हा २०१९ व २०२२ साठी (प्रत्येकी ५१ हजार रुपये) लोकमत नाशिकचे छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट छायाचित्रकार राज्य पुरस्कार (२०२०) लोकमत नांदेडचे सचिन मोहिते (५१ हजार रुपये) यांना जाहीर झाला आहे. विभागीय पुरस्कारांमध्ये दादासाहेब पोतनीस पुरस्कार लोकमत जळगावचे कुंदन पाटील, अनंतराव भालेराव पुरस्कार, लोकमत लातूरचे हरी मोकाशे, ग. गो. जाधव पुरस्कार लोकमत सिंधुदुर्गचे महेश सरनाईक, शि. म. परांजपे पुरस्कार, लोकमत रत्नागिरीचे अरुण आडिवरेकर व लोकनायक बापूजी अणे पुरस्कार- २०२२ लोकमत अमरावतीचे गजानन मोहोड, आचार्य अत्रे पुरस्कार लोकमत मुंबईचे सचिन लुंगसे, ग. त्र्यं. माडखोलकर पु्रस्कार लोकमत नागपूरचे योगेश पांडे व लोकमत चंद्रपूरचे राजेश बारसागडे (२०२३), ग. गो. जाधव पुरस्कार (२०१९) लोकमत कोल्हापूरचे भारत चव्हाण, दादासाहेब पोतनीस पुरस्कार लोकमत नंदुरबारचे मनोज शेलार यांचा समावेश आहे. 

तसेच तोलाराम कुकरेजा राज्यस्तरीय पुरस्कार- २०२३ छायाचित्रकार राजू ठाकरे यांना आणि लोकनायक बापूजी अणे विभागीय पुरस्कार अविनाश साबापुरे यांना अनुक्रमे ‘लोकमत’मधील त्यांचे छायाचित्र आणि वृत्तांकनासाठी जाहीर झाला आहे. 

टॅग्स :Journalistपत्रकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार