शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Lok Sabha Elections 2024: मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा; सर्वाधिक जागा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 12:35 IST

पुढील लोकसभा निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. 

मुंबई - अलीकडेच राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. मविआच्या या विजयानंतर काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी नेत्यांनी आता आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याची माहिती समोर येत आहे. 

सूत्रांनुसार, ४८ जागांपैकी ठाकरे गटाला २१, राष्ट्रवादी १९ तर काँग्रेस ८ जागांवर निवडणूक लढवेल असं सांगण्यात येत आहे. मुंबईतील ६ जागांपैकी ठाकरे गटाला ४ तर काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येकी १ जागा लढवण्यास मिळू शकते. लोकसभा निवडणुकीला १ वर्ष शिल्लक आहे. त्यामुळे या निवडणुकीत जास्तीत जागा जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ जागांपैकी ५-६ जागा अशा आहेत त्याठिकाणी महाविकास आघाडीचे एकमत झाले नाही. त्यासाठी या जागांवर बदल होऊ शकतो. भाजपाने तिसऱ्यांदा सरकार बनवण्यासाठी प्लॅन तयार केला आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीत मिशन ४५ हाती घेतले आहे. त्यानुसार राज्यभरात ठिकठिकाणी भाजपा नेते कामाला लागले आहेत. त्याचसोबत केंद्रीय मंत्र्यांवरही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेसनं फेटाळली चर्चा

दरम्यान, महाविकास आघाडीत कुठलाही जागावाटप फॉर्म्युला ठरला नाही. ही सर्व हवाई पुलाव आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नाही. मी २ दिवसांत दिल्लीला जाणार आहे. या सर्व चर्चा केंद्रीय नेतृत्वासमोर करू. मग महाराष्ट्रात पुढे काय करायचं यावर आम्ही येथील नेत्यांमध्ये चर्चा करू. परंतु जागावाटपाबाबत काही ठरले नाही असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही चर्चा फेटाळली आहे. 

२०१९ च्या लोकसभेचं गणित काय?महाराष्ट्रात ४८ जागांवर २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी शिवसेना-भाजपा एकत्रित निवडणुकीला सामोरे गेले होते. २०१९ मध्ये ४८ पैकी २३ जागांवर भाजपाने विजय मिळवला तर १८ जागांवर शिवसेना विजयी झाली होती. तर राष्ट्रवादीने ४ जागा आणि काँग्रेसने १ जागेवर विजय मिळवला. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे. त्यात शिवसेनेच्या अनेक बालेकिल्ल्यावर भाजपाची नजर आहे. 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त निवडून आणण्याचे टार्गेट पक्षातील नेत्यांना दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची प्रत्येक योजना सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहचवा असं निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील नेत्यांना दिले आहेत. पुढील लोकसभा निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस