शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

निवडणुकीचा असा निकाल अपेक्षित नव्हता- प्रफुल पटेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 15:32 IST

लोकसभेतील दारुण पराभवावर पटेल यांची प्रतिक्रिया

भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. शहरासह गावात जे वातावरण होते ते भाजपच्या विरोधात होते. विशेषत: शेतकरी, बेरोजगार युवक प्रचंड नाराज होते. अशा स्थितीत निवडणुकीचा असा निकाल असा अपेक्षित नव्हता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले. निवडणुकीच्या निकालानंतर भंडारा येथे प्रथमच आयोजित पत्रकार परिषदेत खा. पटेल बोलत होते. ते म्हणाले, लोकसभेच्या निकालानंतर यावर नेमके काय बोलायचे याबाबत आम्ही सर्वच निरूत्तर आहोत. गावागावातील वातावरण व राष्ट्रवादी पक्षासह मित्र पक्षांनी केलेल्या पाहणीदरम्यान जनमताचा कौल हा भाजपविरोधी होता. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे जेवढ्या फरकाने पराभूत झाले, तेवढा आम्ही विचारदेखील केला नव्हता. विशेषत: तिरोडा व मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात मतांचे अंतर अचंबित करणारे आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर क्षेत्र वगळल्यास सर्वच ठिकाणी मतांचा कौल आमच्या बाजूने राहील, असे सर्वेक्षणातून वाटत होते. याबाबत मी स्वत:ही पक्ष कार्यकर्त्यांच्या मदतीने सत्यता पडताळून पाहिली होती. परंतु हाती आलेला निकाल आम्हाला निरूत्तर करून गेला. ईव्हीएमबाबत बोलताना खासदार पटेल म्हणाले, ईव्हीएम मशीनबाबत आमचा आक्षेप नाही. परंतु मागील दोन महिन्यात तब्बल तीनवेळा देशभरातील २२ राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. मात्र आमच्या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आले. भविष्यात निवडणुकीदरम्यान दुसरा पर्याय काय आहे, यावरही विश्लेषण व चर्चा होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार अनिल बावनकर, नरेश डहारे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPraful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा