शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे समर्थक आमदार 'देवगिरी' बंगल्यावर; अजित पवारांच्या भेटीनं चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 12:36 IST

Shankarrao Gadakh : शंकरराव गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून विजयी झाले होते

मुंबई -  shankarrao gadakh met ajit pawar ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त गाठीभेटी आणि बैठका मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्यात नेवासा मतदारसंघातील अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. गडाख हे सकाळी देवगिरी बंगल्यावर पोहचले त्यावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यात त्यांच्या गाड्यांचा ताफा कैद झाला. अजित पवार आणि शंकरराव गडाख यांच्या भेटीमुळे नगर जिल्ह्यात काही वेगळी समीकरणे तयार होतायेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. 

या भेटीनंतर शंकरराव गडाख यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी अजित पवारांना दुसऱ्यांदा भेटायला आलो आहे. अजित पवारांनी दिलीप वळसे पाटलांना भेटायला सांगितले होते. आज वळसे पाटील देवगिरी बंगल्यावर होते. त्यामुळे मी इथं आलो. मतदारसंघातले जे विकासाचे प्रश्न आहेत त्याबाबत ही भेट होती. त्यात राजकीय चर्चा झाली नाही. मी कामाकरता अजितदादांना, देवेंद्र फडणवीस यांना भेटत असतो. कारण लोकांचे काम करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम असते. त्याचा गैर अर्थ कुणीही काढू नये असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमच्या भेटीत काही राजकीय चर्चा झाली नाही. प्रत्येकजण स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम असतो. लंके यांनी निर्णय घेतलेला आहे. परंतु आमच्या भेटीत तशी काही चर्चा झाली नाही. आमचा मतदारसंघ नेवासा हा शिर्डी मतदारसंघात येतो. हा मतदारसंघ राखीव असल्याने तिथे उभं राहण्याचा काही प्रश्न नाही असंही आमदार शंकरराव गडाख यांनी स्पष्ट केले. 

कोण आहेत शंकरराव गडाख?

शंकरराव गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी विजयी झाल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. त्यांना मंत्रिपदही देण्यात आलं होते. त्यानंतर शिवसेनेत बंड झाल्यानंतरही गडाख यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आता गडाख यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची भेट घेतली त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. गडाख हे नगर जिल्ह्यातील नेते आहेत. नुकतेच आमदार नीलेश लंके यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाची ताकद कमी झाली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shankarrao Gadakhशंकरराव गडाख