शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या सभांचा धुरळा, उमेदवारांची दमछाक; उरले केवळ दोन दिवस, लोकसभेचे काउंटडाऊन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 08:37 IST

नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ४ जूनलाच खरे काय ते समजणार आहे.

वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ मतदारसंघांमध्ये २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आता जाहीर प्रचारासाठी मंगळवार आणि बुधवार हे दोनच दिवस उरले आहेत. बुधवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावणार असल्याने उमेदवारांची जनसंपर्कासाठी धावपळ सुरू आहे. 

धाकधूक वाढली, काय होणार?मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. नेत्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद बघून विजय, पराजयाचे दावे केले जात आहे. मतदार केवळ नेत्यांचे भाषण ऐकण्यात दंग आहेत. त्यांनी अद्याप आपले पत्ते उघड केले नाहीत. त्यामुळे नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ४ जूनलाच खरे काय ते समजणार आहे.

जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत आठही लोकसभा मतदारसंघांमध्ये नेत्यांच्या सभांचा धुरळा उडत आहे. दररोज कुठे ना कुठे सभा होत आहेत. त्यामुळे खुद्द उमेदवारांचीही दमछाक होताना दिसून येत आहे. बुधवारी सायंकाळी प्रचार थांबल्यानंतर मूक प्रचाराला सुरुवात होईल. तत्पूर्वी विविध नेत्यांना आपल्या मतदारसंघात आणून मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करताना उमेदवार दिसून येत आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांना मतदारसंघात पाचारण केले जात आहे. एक सभा होण्यापूर्वीच उमेदवारांना दुसऱ्या नेत्यांच्या सभेला धावपळ करत पोहोचावे लागत आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे