शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
6
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
7
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
8
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
9
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
10
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
11
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
12
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
13
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
14
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
15
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
16
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
17
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
18
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
19
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
20
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका

मराठी नेते परराज्यात करताहेत पडद्यामागील जोरदार हालचाली; प्रभारीं’ची रणनीती ठरणार निर्णायक

By यदू जोशी | Published: April 27, 2024 9:21 AM

उत्तर प्रदेशमधील निकाल आश्चर्यकारक असतील, असा दावा काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी केला आहे.

मुंबई : विविध राज्यांमध्ये आपापल्या पक्षांचे प्रभारी, सहप्रभारी म्हणून जबाबदारी मिळालेले मराठी नेते सध्या त्या-त्या राज्यात प्रचार यंत्रणेचे नियोजन करण्यात व्यग्र आहेत. यानिमित्ताने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  

उत्तर प्रदेशमधील निकाल आश्चर्यकारक असतील, असा दावा काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी केला आहे. तर बिहारमधील समीकरणे भाजपच्या बाजूने असून तिथे ३५ हून अधिक जागा जिंकू, असा दावा भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी केला आहे.  

मुकुल वासनिकांकडे गुजरातविदर्भातील बुलढाणा, रामटेकचे खासदार राहिलेले अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक हे काँग्रेससाठी अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या गुजरात राज्याचे प्रभारी आहेत. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने याठिकाणी सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. तेथे पक्षाला उभारी देण्याचे प्रयत्न आता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहेत.  

अविनाश पांडेंकडे उत्तर प्रदेशअविनाश पांडे हे मूळ नागपूरचे, पण गेली दोन दशकेे ते राष्ट्रीय स्तरावरील पक्ष संघटनेत महत्त्वाची पदे भूषवत आहेत. त्यांच्याकडे यावेळी उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. आधी प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशच्या प्रभारी होत्या, त्या जागी पांडे यांना पक्षश्रेष्ठींनी नेमले आहे. आतापर्यंत ४० लोकसभा मतदारसंघांमध्ये जाऊन त्यांनी मित्रपक्षांसह काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेशी समन्वय साधला आहे. 

माणिकराव ठाकरेंकडे गोवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर तेलंगणाचे प्रभारी म्हणून विधानसभा निवडणुकीत जबाबदारी होती, तेथे काँग्रेसचे सरकार बनले. आता लोकसभेसाठी ठाकरे हे गोवा, दादरा नगर हवेली, दिव-दमणचे प्रभारी आहेत. तेथे लोकसभेच्या चार जागा असून, काँग्रेसला निश्चितपणे गेल्यावेळेपेक्षा चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

विनोद तावडेंकडे संवेदनशील बिहार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशा बिहार राज्याची जबाबदारी आहे. तिथे भाजप-जदयु, लोकजनशक्ती पार्टी, हिंदुस्थान अवाम मोर्चा, राष्ट्रीय लोकमोर्चा अशी युती आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांना पुन्हा भाजपसोबत आणण्यात तावडे यांची भूमिका होती. तसेच आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडूंना भाजपसोबत आणण्यातही त्यांची भूमिका राहिली. 

विजया रहाटकर, विनय सहस्रबुद्धेंकडे राजस्थान विजया रहाटकर या भाजपच्या राष्ट्रीय सचिव असून, राजस्थान भाजपच्या सहप्रभारी आहेत. पण तिथे पक्षाने प्रभारी नेमलेले नसल्याने ती जबाबदारीही रहाटकर यांच्याकडेच आहे. आधीच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा भाजपला देणाऱ्या राजस्थानमध्ये सहा ते सात जागांवर भाजप यावेळी अडचणीत असल्याचे म्हटले जाते. यावर रहाटकर म्हणाल्या की, राजस्थान पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्वच्या सर्व जागा भाजपला नक्कीच देईल. महाराष्ट्रातील विनय सहस्रबुद्धे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राजस्थानचे निवडणूक प्रभारी म्हणून नेमले आहे. ते म्हणाले की, राजस्थानमध्ये जातीय अस्मिता टोकाच्या असतात. पण त्या पलीकडे जाऊन सर्वच समाज मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठीच कौल देतील, असा आमचा विश्वास आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा