शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

भाजपाचं संकल्पपत्र कागदी नसून ती मोदींची गॅरंटी; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 11:27 IST

lok sabha Election 2024: भाजपा देशात सत्तेत आल्यास संविधान बदलणार असा आरोप सातत्याने केला जातोय, त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. त्याचसोबत भाजपाच्या संकल्पपत्रातून पुढील ५ वर्षात काय करणार याबाबत थोडक्यात सांगितले

नागपूर - Devendra Fadnavis on Congress ( Marathi News ) २०१९ ला मोदी सरकारने जो जाहीरनामा दिला होता, त्यात जी ७५ आश्वासने दिली होती ती सर्व पूर्ण करण्यात आली आहेत. भाजपाचं संकल्पपत्र हे कागदी नसून ती मोदींची गॅरंटी आहे. देशातील सर्व घटकांचा विकास करण्याचा संकल्प भाजपाचा आहे. देशभरातील १५ लाख लोकांच्या सूचनेतून भाजपाचं संकल्पपत्र तयार करण्यात आलं आहे. मोदी गॅरंटीवर जनतेचा विश्वास असून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्रात आणि देशात येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसनं राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल, कर्नाटक यासारख्या राज्यात एकही गोष्ट जाहीरनाम्यातील केली नाही. काँग्रेससाठी जाहीरनामा हा कागद आहे आणि पण आमच्यासाठी जाहीरनामा हा संकल्प आहे. काँग्रेसनं दिलेली आश्वासने पूर्ण केली जात नाहीत. राहुल गांधी स्वत: वाचत नाहीत त्यांना कुणीतरी फिड करत असते. काँग्रेसचा जाहीरनामा हा फेल जाहीरनामा आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान होते, म्हणून चहा विकणारा देशाचा पंतप्रधान झाला. जेव्हा मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे घेतली तेव्हा भारताच्या संविधानासमोर हात जोडून ते स्वीकारले. संविधान बदलण्याचा विचार आजपर्यंत कुणी केला नाही. संविधानातील मूळ गाभा बदलण्याचा अधिकार संसदेला नाही हे सुप्रीम कोर्टानेही सांगितले आहे. काँग्रेसकडे विश्वासार्हता नाही, कुठलेही विकासाचा मुद्दा नाही. त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेस करतंय असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

दरम्यान, अग्निवीर योजना रद्द करणं म्हणजे देशाला धोक्यात टाकणं आहे. देशातील सैन्य युवा असलं पाहिजे, जे इतर देशात आहे. आज देशात मोठ्या प्रमाणात अग्निवीर भरती झालेले आहेत आणि ते देशाच्या सीमेवर लोकांचं रक्षण करत आहेत असं फडणवीसांनी सांगितले. 

भाजपाच्या संकल्पपत्रात काय आहे?

  • पुढील ५ वर्षात पंतप्रधान सूर्यघर योजनेतून १ कोटी घरांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज देण्यात येईल. त्यातून या कुटुंबाचं वीजदर जवळपास शून्य करण्यात येईल. 
  • मुद्रा योजनेतून ६० टक्के महिलांना कर्ज मिळालं. महिला, तरुणांना कुठल्याही व्याजविना दिले जात आहे. शेतकऱ्यांसाठीही संकल्पपत्रात मोठ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. 
  • पीएम किसान निधीतून पुढील ५ वर्षही ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. पीकविमा आणखी मजबूत करण्यात येणार आहे. प्रमुख पीकांच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे. पुढील काळातही भरघोस वाढ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 
  • भाजीपाला नासंवत असल्याने त्याचा साठा करण्यासाठी योग्य यंत्रणा उभारण्यात येणार आहे. नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार करायचा. मागच्या ५ वर्षात २५ लाख हेक्टर जमीन देशभरात सिंचनाखाली आली. पुढील काळात सिंचन क्षेत्राचा विकास करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. 
  • देशात पहिल्यांदा १०० टक्के कृषी सॅटेलाईट सोडण्यात येणार आहे. वातावरणाच्या बदलामुळे जो परिणाम होतोय त्यातून कृषी क्षेत्राला मुक्ती मिळेल. त्यातून पिकांचे निरिक्षणही होईल. कृषी क्षेत्रात डिजिटल सुविधा आणखी सुकर करण्यात येईल. 
  • पारदर्शक पद्धतीने भरतीची प्रक्रिया, पेपरफुटीविरोधात अतिशय कडक कायदा याचाही संकल्पपत्रात उल्लेख आहे. देशात स्टार्टअप मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यातून रोजगारनिर्मिती होतेय. या क्षेत्राला विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येणार आहे. 
  • उत्पादन क्षेत्रावर भर दिला जात आहे. भारत सर्व क्षेत्रात जागतिक खेळाडू म्हणून चीन खालोखाल पुरवठादार म्हणून विकसित होतोय. त्यामुळे उत्पादन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येणार आहे. 
  • किमान वेतनात वाढ करण्यासाठी धोरण आखणार, त्यातून असंघटित कामगारांना मोठा फायदा होणार आहे. मागच्या काळात १ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. 
  • महिला बचत गटासाठी ८ लाख कोटी रुपये दिलेत. महिला बचत गटाची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी साखळी उभारण्यात येत आहे. सार्वजनिक बसस्टँड, रेल्वे स्थानका याठिकाणी बचत गटातील उत्पादने विक्री केंद्र उभारण्यावर भर देण्यात येत आहे. 
  • रेल्वे प्रवाशांसाठी जी वेटिंग लिस्ट असते ती यापुढे राहणार नाही अशाप्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे. सहजपणे प्रवाशांना रेल्वे तिकिट उपलब्ध होईल. पुढील ५ वर्षात भारतातील सर्व रेल्वे स्टेशन जागतिक दर्जाचे आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त करण्यात येईल. 
  • प्रादेशिक दळणवळणासाठी रेल्वेचा विस्तार करण्यात येणार आहे. १३ हजारापेक्षा जास्त स्टेशनचा विकास करण्यात येणार आहे. सर्व भागात या ट्रेन्स पोहचवण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनचा विस्तार वाढवण्यात येणार आहे. रेल्वे संबंधित सर्व सेवा एका APP च्या माध्यमातून देण्यात येतील. 
  • भारतातील साहित्य आणि संस्कृती हे विदेशी भाषांमध्ये आणून जगभरात पोहचवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्रैवार्षिक सांस्कृतिक संमेलनाच्या आधारे जगभरात भारतीय संस्कृतीचं प्रचार, प्रसार करण्यात येईल. स्मारकांचे जिर्णोद्धार आणि जतन करण्याचं काम केले जाणार आहे. पर्यटनावर विशेष भर देऊन त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
  • पुढील काळातही भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरू राहणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये देशाने काय काय केले पाहिजे अशाप्रकारच्या सूचना केल्या आहेत. संपूर्ण देशात समान नागरिक कायदा आणेल असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यात लिहिलं आहे. हाच समान नागरी कायदा देशात लागू करण्यात येईल. त्यातून सगळ्यात जास्त अधिकार महिलांना मिळणार आहे. 
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४