होय, उदयनराजेंचा फोन साधाच आहे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 14:36 IST2019-03-30T14:34:47+5:302019-03-30T14:36:42+5:30
सोशल मीडियावर एवढे फॉलोवर्स असणारे उदयनराजे मात्र स्वत: साधाच मोबाईल वापरतात.

होय, उदयनराजेंचा फोन साधाच आहे
मुंबई - साताऱ्याचे विद्यमान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कॉलर उडविण्याच्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. एवढच नाही, तर सोशल मीडियावर उदयनराजे यांचे लाखो फॉलोवर्स आहेत. त्यांच्या एका पोस्टला हजारोने लाईक्स आणि कमेंट मिळत असतात. सोशल मीडियावर एवढे फॉलोवर्स असणारे उदयनराजे मात्र स्वत: साधाच मोबाईल वापरतात.
अनेक राजकीय नेत्यांकडे लाखो रुपये किंमतीचे मोबाईल पहायला मिळतात. तसेच हे नेते मोबाईलवरूनच सोशल मीडियावर वैयक्तीकरित्य सक्रीय दिसून येतात. याउलट उदयनराजे साधा मोबाईल वापरतात. यातून ते आपला साधेपणा जपताना दिसतात. जनतेत गेल्यावर जनतेचे होऊन जाणारे उदयनराजे कधीही मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसत नाहीत.
उदयनराजे यांच्या बिनधास्त स्टाईलचे लाखो चाहते आहेत. त्यातच त्यांची कॉलर उडविण्याची पोस्ट असेल तर मग झालच. त्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा अक्षरश: पाऊस पडतो. सातारा लोकसभा मतदार संघातून विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज असलेले उदयनराजे सोशल मीडियावर एक्टीव्ह असले तरी स्वत: मोबाईलवरून उदयनराजे सोशल मीडियावर व्यस्त असल्याचे दिसत नाही. तरी देखील त्यांची फॅन फॉलोविंग इतर नेत्यांपेक्षा अधिकच आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील जाहीर सभेत उदयनराजे यांची कॉलर उडविली होती. त्यावेळी सभेत एकच हशा पिकला होता. उदयनराजे यांची ही स्टाईल तरुणाईला भुरळ घालत घालते. ज्याप्रमाणे उदयनराजे यांचा सातारमध्ये दरारा आहे, तोच दरारा त्यांचा सोशल मीडियावर देखील असल्याचे स्पष्ट दिसते.