lok sabha election 2019 raj thackeray solapur sabha | राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ', म्हणताच विरोधकांना भरते धडकी ?

राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ', म्हणताच विरोधकांना भरते धडकी ?


मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून जरी माघार घेतली असली तरीही आज सर्वाधिक चर्चा राज ठाकरेंच्या सभांचीच आहे. प्रत्येक सभेत राज ठाकरे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोलखोल करत आहे. नांदेड आणि सोलापुरात राज यांच्या सभानंतर युतीने धसका घेतला आहे. ज्याप्रमाणे राज ठाकरे भाजपवर पुराव्यासहित हल्लाबोल करत आहे, त्यामुळे युती सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. 

राज ठाकरे भाषणात जेव्हा ते म्हणतात, लाव रे तो व्हिडिओ. त्यानंतर राज काय पोलखोल करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागते. विशेष करून भाजप नेत्यांच्या छातीत धडकी भरते अशी चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. नांदेड आणि सोलापूरच्या सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने व्हिडीओ स्क्रीनवर दाखवत खिल्ली उडवली.

प्रत्येक सभेत मोदींचे व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंनी सोलापूरच्या सभेत मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'होय माझ सरकार' जाहिरातीची पोलखोल केली. जाहिरातीत दाखवण्यात आलेल्या तरुणाला त्यांनी थेट स्टेजवर आणत सरकारच्या जाहिरातीचा बुरखा फाडला. एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्री किती खोट बोलतात हे देखील राज यांनी सभेत सांगितले. 

राज ठाकरे भाजप विरोधात आपल्या सभा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज यांच्या  भाषणांनी युतीच्या उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे. राज यांची सभा आपल्या मतदारसंघात नकोच असे युतीच्या उमेदवारांना वाटत आहे. तर दुसरीकडे महाआघाडीच्या उमदेवार आपल्या मतदारसंघात राज ठाकरेंची सभा व्हावी 

Web Title: lok sabha election 2019 raj thackeray solapur sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.