शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय गुलामी संपली; काँग्रेसशी यापुढं समान पातळीवर चर्चा : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 15:22 IST

प्रकाश आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ लाखांहून अधिक मतं मिळाली आहे. औरंगाबादमधून इम्तियाज जलील हे निवडून आले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची डोकेदुखी ठरणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आता विधानसभा निवडणुकीची तयारी  सुरु केली आहे. विधानसभेत काँग्रेसला चर्चा करायची असल्यास ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण 'काँग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली आहे.' असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी याबाबत पोस्ट शेयर केली आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागा वाटपावरून एकमत न झाल्याने युती झाली नाही. परिणामी, प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आणि इतर नेत्यांना सोबत घेत वंचित बहुजन आघाडीचे ४८ उमेदवार उभे करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. निवडणुकीत अनेक मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने लाखांच्यावर मतं घेतली. त्यामुळे, कॉंग्रेसच्या उमेदवारांचा अनेक ठिकाणी पराभव झाला. आता, विधानसभेत कॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल असं प्रकाश आंबेडकर म्हंटले आहे.

प्रकाश आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ लाखांहून अधिक मतं मिळाली आहे. औरंगाबादमधून इम्तियाज जलील हे निवडून आले आहे. आघाडीला मिळालेल्या मतांमुळं महाराष्ट्रात काँग्रेसला नऊ जागांवर पराभव पत्करावा लागला आहे. वंचित बहुजन आघाडीमुळेच राज्यात कॉंग्रेसला अपयश आले असल्याचे काँग्रेसनंही मान्य केला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेससोबत जाणार का औत्सुक्याचे ठरेल.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAshok Chavanअशोक चव्हाणVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेस