शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

हॅशटॅग 'लाज कशी वाटत नाही ?', मोहिम आता रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 15:58 IST

आघाडीकडून राबविण्यात येणारी ही मोहिम केवळ सोशल मीडियावर नसून प्रत्यक्षात रस्त्यावर देखील सुरू करण्यात आली आहे. अनेक शहरात सर्व सामान्यांचे प्रश्न घेऊन 'लाज कशी वाटत नाही ? अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

मुंबई - काँग्रेसच्या 'चौकीदार चोर है' या मोहिमेला छेद देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘मै भी चौकीदार’ ही टॅग लाईन घेऊन २०१९ च्या निवडणुकीचा प्रचार सुरू केला. त्याच्या एक पाउल पुढे जात आता महाआघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 'लाज कशी वाटत नाही ?, ही मोहिम सुरू केली आहे. आघाडीकडून राबविण्यात येणारी ही मोहिम केवळ सोशल मीडियावर नसून प्रत्यक्षात रस्त्यावर देखील सुरू करण्यात आली आहे. अनेक शहरात सर्व सामान्यांचे प्रश्न घेऊन 'लाज कशी वाटत नाही ? अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

पाच वर्षांत जनतेची केलेली फसवणूक, शेतकरी कर्जमाफीचे गाजर, उज्ज्‍वला योजनेचे अपयश, वाढलेली बेरोजगारी याचा जाब काँग्रेस-राष्ट्रवादी ‘लाज कशी वाटत नाही’ या मोहिमेतून भाजप-शिवसेनेला विचारत आहे. विशेष म्हणजे भाजपविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी संयुक्तपणे प्रचार करताना दिसत आहे. तर युतीमध्ये भाजप एकटेच विरोधकांना उत्तर देताना दिसत आहे.

एवढे दिवस केवळ सोशल मीडियावर राबविण्यात येत असलेली ही मोहिम राज्यभरातील विविध शहरात राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून बॅनरच्या माध्यमातून शिवसेना-भाजपवर टीका करण्यात येत आहे. अकोला येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर आघाडीकडून महिलांविषयी करण्यात आलेल्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे.

मुली पळविण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना लाज कशी वाटत नाही, असा सवाल करण्यात आला आहे. तसेच परिवर्तन होणारच, महाआघाडी येणारच, असंही बॅनरवर म्हटले आहे. गेल्या वर्षी दहिहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी महिलांविषयी वादग्रस्त विधान करत मुलींना पळवून आणू असं म्हटले होते. त्याचा समाचार या बॅनरमध्ये घेण्यात आला आहे. असे अनेक मुद्दे घेऊन आघाडीची मोहिम सुरू आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSocial Mediaसोशल मीडिया