शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Lok Sabha Election 2019: निवडणुका जाहीर; तरी आघाडी, युतीमधील जागांचा घोळ कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 05:23 IST

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक; आठवले, जानकरांच्या पक्षाचे काय होणार?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरी भाजपा-शिवसेनेची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी या दोघांनाही अद्याप जागावाटपास अंतिम स्वरुप देता आलेले नाही. दोघांचाही घोळ कायम आहे. युती कागदावरच झाली; आघाडी तर कागदावरही उतरू शकलेली नाही.युतीमध्ये भाजपा २५ आणि शिवसेना २३ जागा लढणार हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, भाजपाच्या जागा कोणत्या आणि शिवसेनेच्या कोणत्या हे अजूनही जाहीर करण्यात आलेले नाही. पालघरची जागा शिवसेनेकडे जाणार असे खात्रीलायकरीत्या म्हटले जात असले तरी त्या बाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. साताराची जागा शिवसेनेकडून भाजपाकडे जाईल का हे ठरलेले नाही.युतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी २०१४ मध्ये बारामतीची जागा लढविली होती. रामदास आठवले यांच्या रिपाइंला साताराची जागा देण्यात आली होती. यावेळी हे दोन्ही पक्ष प्रतीक्षेत आहेत. गेल्यावेळी एनडीएमध्ये असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले आणि माढा अशा दोन जागा देण्यात आल्या होत्या. आता शेट्टी एनडीएमधून बाहेर पडले आहेत.आघाडीमध्ये तर काँग्रेस किती जागा लढणार आणि राष्ट्रवादी किती लढणार या बाबतचा आकडादेखील जाहीर झालेला नाही. कोण कोणत्या जागा लढणार हे अनिश्चित आहे. काही जागांच्या अदलाबदलीवरून वाद कायम आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हातकणंगले आणि बुलडाणा अशा दोन जागांची महाआघाडीत मागणी केली आहे. बुलडाणा राष्ट्रवादीकडे आहे.युतीबाबतचे प्रश्न१) भाजपा आणि शिवसेना नेमके कोणत्या जागा लढणार?२) भाजपा-शिवसेना व्यतिरिक्त असलेल्या मित्रपक्षांनाकिती आणि कोणत्या जागा देणार?आघाडीबाबतचे प्रश्न१) काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेमके कोणत्या जागा लढणार?२) स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेणार की नाही?३) अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर आघाडीसोबत जाणार का?लोकसभा २०१४ : एक दृष्टिक्षेपभाजपालढविलेल्या जागा- २४जिंकलेल्या जागा- २३मतांची टक्केवारी- २७.३२शिवसेनालढविलेल्या जागा- २०जिंकलेल्या जागा- १८मतांची टक्केवारी- २०.६काँग्रेसलढविलेल्या जागा- २६जिंकलेल्या जागा- २मतांची टक्केवारी- १८.१राष्टÑवादी काँग्रेसलढविलेल्या जागा- २१जिंकलेल्या जागा- ४मतांची टक्केवारी- १५.९

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना