शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदी, शहा नको, कुणीही येऊ द्या : राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 18:38 IST

 मोदी, शाह यांनी देश अक्षरश: विकायला काढला आहे. या दोघांनाही घरी बसवलं पाहिजे. परत मोदी पुन्हा सरकार मध्ये आलेत तर देश हुकुमशाहीकडे जाईल अशी भितीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता सर्वाधिक चर्चेत असलेले राज ठाकरे यांच्या सभा भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. आपल्या प्रत्येक सभेत राज ठाकरे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोनच व्यक्ती देश चालवत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते.

राज ठाकरे यांच्या सभांमुळे निश्चितच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. याबाबत राज ठाकरेंना माध्यमांनी विचारले असता, मला मोदी आणि अमित शहा नको मग याचा फायदा कुणलाही होऊ द्या असे त्यांनी सांगितले. मोदी, शाह यांनी देश अक्षरश: विकायला काढला आहे. या दोघांनाही घरी बसवलं पाहिजे. परत मोदी पुन्हा सरकार मध्ये आलेत तर देश हुकुमशाहीकडे जाईल अशी भितीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली. आपल्या ठाकरे शैलीत त्यांनी राज्यातील युतीचा सुद्धा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री आहे. भाजप-शिवसेना दोन्हीही पैशांसाठी आणि सत्तेसाठी लाचार आहेत. मी आधीच सांगितले होते युती होणार आहे. जर युती केली नसती तर शिवसेनेत उभी फूट पडली असती,असही राज यांनी सांगितले. 

राज यांच्याकडून पुराव्यानिशी करण्यात येणारी टीका सत्ताधारी भाजपसाठी निवडणुकीच्या तोंडावर अडचणीची ठरत आहे. मात्र नरेंद्र मोदीं यांच्या विरोधात मनसेच्या इंजिनचा वेग वाढतच आहे. राज यांच्या टीकामुळे भाजपचे किती नुकसान होईल, हे पाहण्यासाठी निवडणूक निकालाचीच वाट पाहावी लागणार आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाShiv Senaशिवसेना