अजिबात नेत्यांच्या पाया पडायचं नाही; अजित पवारांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 01:17 PM2019-04-06T13:17:24+5:302019-04-06T13:18:23+5:30

राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारणात नेत्यांचे पाय धरण्याची पंरपरा अनेक नेते आणि कार्यकर्ते जपताना दिसतात. अनेकदा आमदार, खासदार आणि मंत्री देखील आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या पक्षप्रमुखांचे पाय धरताना दिसतात.

Lok Sabha Election 2019 Ajit Pawar to supporter activists notice | अजिबात नेत्यांच्या पाया पडायचं नाही; अजित पवारांच्या सूचना

अजिबात नेत्यांच्या पाया पडायचं नाही; अजित पवारांच्या सूचना

Next

मुंबई - देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून अनेक नेते मंडळी प्रचारासाठी विविध मतदार संघ पिंजून काढत आहेत. या निमित्ताने नेतेमंडळी मनमोकळेपणाने मतदारांशी संवाद साधत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची नुकतीच माढा मतदार संघात सभा झाली. यावेळी त्यांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे सांगताना कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या अजिबात पाया पडायचे नाही, असा कानमंत्र दिली.

राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारणात नेत्यांचे पाय धरण्याची पंरपरा अनेक नेते आणि कार्यकर्ते जपताना दिसतात. अनेकदा आमदार, खासदार आणि मंत्री देखील आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या पक्षप्रमुखांचे पाय धरताना दिसतात. औरंगाबादचे खासदार चंद्रकात खैरे यांनी देखील एका जाहीर कार्यक्रमात युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांचे पाय धरले होते. तर राज्यमंत्री संजय राठोड हे देखील आदित्य ठाकरे यांच्या पाया पडले होते. वास्तविक पाहता या दोघांपेक्षा अदित्य ठाकरे वयाने फार लहान आहेत. परंतु, या घटनांमुळे राजकारणातील पाया पडण्याची संस्कृती समोर आली आहे. परंतु, अजित पवार यासाठी अपवाद आहेत.

या नेत्याच्या पाया पड, त्या नेत्याच्या पाया पड, असा माढा मतदार संघातील इतिहास होता. यापुढे कोणत्याही नेत्यांच्या पाया पडायचे नाही. उपमुख्यमंत्री असताना मी बंगल्यावर पाटी लावली होती, कुणीही पाया पडू नये. कशाला कुणाच्या पाया पडायचं ? असा सवाल करत अजित पवार यांनी आई-बापाच्या पाया पडा, असा सल्ला कार्यकर्त्यांना देत मोहिते पाटील कुटुंबाला टोला लगावला. यावेळी अजित पवार यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्दावरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रातील आणि राज्यातील सरकार निव्वळ थापेबाज असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

 

Web Title: Lok Sabha Election 2019 Ajit Pawar to supporter activists notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.