Lok Sabha 2019 Exit poll: Will there be results like exit poll? - Shiv Sena | Lok Sabha 2019 Exit Poll: एक्झिट पोलप्रमाणे निकाल असतील का? - शिवसेना 
Lok Sabha 2019 Exit Poll: एक्झिट पोलप्रमाणे निकाल असतील का? - शिवसेना 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी निकालांबाबतचे अंदाज व्यक्त केले. यामध्ये बहुतांश सर्व्हे करणाऱ्या संस्थांनी एनडीए बहुमताचा आकडा पार करताना दाखविला आहे. अर्थातच हे एक्झिट पोल आहेत खरे जे निर्णय येतील आणि ते याच आजच्या एक्झिट पोल प्रमाणे असतील का? अजून काही वेगळे असतील का? अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. 

एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, एक्झिट पोलमध्ये दाखविल्याप्रमाणे अजून काही जास्त चांगले निकाल असतील याचे उत्तर लवकरच आपल्या मिळणार आहे  सर्व एक्झिट पोल पाहिल्यानंतर असे लक्षात येते की जो काही अंतिम निकाल येणार आहे तो २३ मे रोजी येणार आहे. जनतेचा जो काही कौल असेल तो लोकशाही मध्ये आदरपूर्वक स्विकारणे हेच प्रत्येकाचे कर्तव्य असते. एनडीएला अत्यंत चांगल्या प्रकारचे यश भारतामध्ये आणि महाराष्ट्रात दाखवलेले आहे त्याबद्दल अर्थातच मनात आनंद वाटत आहे, खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 


तसेच जो जनतेचा निर्णय असेल तो आम्ही संपूर्णपणानी नम्रता पूर्वक आणि जी जनतेने जबाबदारी टाकली आहे ती स्वीकारण्याची मानसिकता ठेवून आम्ही स्वीकारू असा विश्वासही शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांचा सर्वसाधारण कौल भाजप-शिवसेना महायुतीला राहील. मात्र, २०१४च्या तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा काही प्रमाणात वाढतील, असा अंदाज सर्वच मतदानोत्तर एक्झिट पोलमध्ये वर्तविला आहे.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २३, शिवसेनेने १८, राष्ट्रवादीने ४ तर काँग्रेसने २ जागा जिंकल्या होत्या. एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी जिंकली होती. या वेळी ते महाआघाडीसोबत होते. आजच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे संख्याबळ निश्चितपणे वाढेल, पण ते युतीपासून फारच दूर असेल. दोन आकड्यांमध्ये जागा मिळविण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न हे स्वप्नच राहील, असे दिसते. राज्यात चार महिन्यांनंतर विधानसभा निवडणूक होत असताना लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळताना दिसणे, ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासादायक ठरू शकेल.Web Title: Lok Sabha 2019 Exit poll: Will there be results like exit poll? - Shiv Sena
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.