Coronavirus Lockdown: राज्यात लवकरच लॉकडाउन; लोकांना त्रास होऊ नये, यासाठी तयारी सुरू - राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 09:09 PM2021-04-12T21:09:21+5:302021-04-12T21:12:19+5:30

लॉकडाउन काळात गरीब जनतेला त्रास होऊ नये, यासाठीही सरकार उपाय-योजना करत आहे. असेही टोपे यावेळी म्हणाले.

Lockdown in the state soon Preparations are underway for people not to be bothered says Rajesh Tope | Coronavirus Lockdown: राज्यात लवकरच लॉकडाउन; लोकांना त्रास होऊ नये, यासाठी तयारी सुरू - राजेश टोपे

Coronavirus Lockdown: राज्यात लवकरच लॉकडाउन; लोकांना त्रास होऊ नये, यासाठी तयारी सुरू - राजेश टोपे

googlenewsNext

मुंबई - देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत आहे. राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर लॉकडाउनची चर्चा सुरू असतानाच, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी, राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लवकरच लॉकडाउन लावला जाईल आणि त्याची तयारी सुरू आहे. लॉकडाउनवर अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे म्हटले आहे. ते मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. (Lockdown in the state soon Preparations are underway for people not to be bothered says Rajesh Tope)

लॉकडाउन काळात गरीब जनतेला त्रास होऊ नये, यासाठीही सरकार उपाय-योजना करत आहे. असेही टोपे यावेळी म्हणाले. तसेच 10वी आणि 12वीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लॉकडाउनच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण जबरदस्त तापले आहे. भाजपसह काही इतर पक्ष राज्यात संपूर्ण लॉकडाउनला विरोध करत आहेत. 

Coronavirus Lockdown News : फक्त लॉकडाउनच पर्याय? पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांनंतर आता राज्यपालांसोबत बैठक

मुंबईत कोविड सेंटरची क्षमता दहा हजार रुग्णांपर्यंत
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणखी क्षमता वाढवण्याचे काम राज्यात सुरू आहे. मुंबईत कोव्हिड सेंटरची क्षमता दहा हजार रुग्णांपर्यंत पोहोचली आहे. त्यात आता दोन नवीन जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रत्येक वॉर्डात नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे. तसेच कोव्हिड सेंटरमध्येही नोडल अधिकारी असणार आहे. आताच्या घडीला नियम तयार करण्यात आलेले आहेत, ते लागू आहेत. सरकार व सरकारमधील सर्व मंत्री एकत्रितपणे परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतील, असे नवाब मलिक म्हणाले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, व्हॅक्सीन सप्लायसह केल्या 'या' तीन मागण्या

तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन करावा, असे मत तज्ज्ञांनी या बैठकीत व्यक्त केले आहे. 

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?

Web Title: Lockdown in the state soon Preparations are underway for people not to be bothered says Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.