शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

लोंढे टोळीकडून परशाचा गेम

By admin | Updated: June 21, 2014 23:18 IST

‘गेम’ कुख्यात अप्पा लोंढे टोळीचा सक्रिय सदस्य असलेल्या बाळ्या ऊर्फ बाळासाहेब चौधरी (रा. बिबवेवाडी) याने त्याच्या 9 साथीदारांसह केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पुणो : कुख्यात बाबा बोडके टोळीचा गुन्हेगार, तसेच गुन्हेगारीतून इस्टेट एजंट बनलेल्या परशा ऊर्फ आबा ऊर्फ परशुराम पांडुरंग जाधव (वय 39, रा. भारती विद्यापीठ परिसर) याचा  ‘गेम’ कुख्यात अप्पा लोंढे टोळीचा सक्रिय सदस्य असलेल्या बाळ्या ऊर्फ बाळासाहेब चौधरी (रा. बिबवेवाडी) याने त्याच्या 9 साथीदारांसह केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हा खून जमिनीच्या वादातून झाला असण्याची शक्यता पोलीस वर्तवीत असून, भारती विद्यापीठ पोलिसांनी चौकशीसाठी काही जणांना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी संजय निवृत्ती मोरे (वय 43, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी चौधरी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परशाची धनकवडीतील तीन हत्ती चौकामध्ये आर्या इस्टेट एजन्सी आहे. तेथे मोरे हे ऑफिसबॉय म्हणून काम करतात. शुक्रवारी संध्याकाळी मोरे यांना परशाने घरी बोलावून घेतले होते. बाबुलाल मोहोळ आणि बाळा नावाच्या व्यक्तीसोबत बैठक असल्याचे त्याने सांगितले होते. परशाचा ड्रायव्हर लक्ष्मण चंद्रकांत रेड्डी आणि मोरे हे परशाला घेऊन सिध्देश हॉटेलमध्ये गेले. तेथून बाबुलाल, हेमंत यादव आणखी एका व्यक्तीला भेटून ते मोटारीतून अभिजित शिवानगेच्या सातारा रस्त्यावरील अथर्व प्लाझामधील पूना प्रॉपर्टीजच्या कार्यालयात गेले. तेथे चहा घेत असतानाच बाबुलालच्या मोबाईलवर बाळा चौधरीचा फोन आला. त्यानंतर परशा, ड्रायव्हर लक्ष्मण, बाबुलाल, हेमंत आणि आणखी एक व्यक्ती हे साडेपाचच्या सुमारास गुजर निंबाळकरवाडी येथे जागा पाहायला गेले. त्यांच्या मागे अभिजित आणि एक जण होता. निंबाळकरवाडीतील सरहद्द शाळेसमोरच्या ओढय़ाच्या पलीकडील जागेवर चौधरी थांबलेला होता. त्याच्यासोबत आणखी काही जण होते. जुने सर्व विसरून जमिनीचा नवीन व्यवहार करू, असे म्हणत चौधरीने परशाला जागा दाखवली. त्या वेळी चौधरीने परशाला  ‘‘तू एकटाच कशाला फिरतोस, बॉडीगार्ड घेऊन फिरत जा, पाहिजेल तर मी लायसन्सवाले बॉडीगार्ड देतो, त्याचा खर्च मी मी बघतो,’’ असे म्हणत बाळ्याने मोठय़ाने शर्माच्या नावाने हाक मारली. त्यानंतर सफारी घातलेल्या शर्माने परशावर गोळी झाडली. त्यानंतर बाळ्याने परशावर गोळी झाडली. परशाभोवती कडे करून उभे राहिलेल्या आणखी तीन ते चार जणांनी बेछुट गोळीबार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या परशाला बघून मोरे आणि बाबुलाल यांनी पळण्याचा प्रयत्न केला असताना बाळ्याने त्यांना धमकी देऊन थांबवले व मोबाईल घेऊन पळाले.
 
4बाळ्या हा बिबवेवाडी परिसरात एक मानवाधिकार संस्था चालवतो. तो कुख्यात अप्पा लोंढेच्या टोळीमध्ये सक्रिय होता. त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, गुन्हे शाखेने बाळ्याच्या एका गुंडाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. नव्यानेच जमीन खरेदी -विक्रीच्या धंद्यामध्ये उतरलेल्या परशाने गेल्या काही महिन्यांत जमिनीचे ताबे मारण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे काही बांधकाम व्यावसायिकांचे नुकसान झाल्याची चर्चा आहे.  
 
4या प्रकरणात न्यायालयाने बजावलेल्या वॉरंटच्या तामिलीचा अहवाल वेळेत पाठविला नाही. तो पाठवणो आवश्यक होते. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्याची माहिती समजली आहे. परंतु, न्यायालयाने कारणो दाखवा नोटीस बजावल्याची माहिती अद्यापर्पयत मिळालेली नाही. नोटीस मिळाल्यास न्यायालयाचा मान राखत कार्यवाही होईल.  
                                            - मनोज लोहिया, अधीक्षक, ग्रामीण पोलीस