LMOTY 2026: नाशिकच्या लेकाची उंच उडी! सर्वेश कुशारेला लोकमतकडून क्रीडा क्षेत्रात मानाचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 18:51 IST2026-03-10T18:48:26+5:302026-03-10T18:51:04+5:30

Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2026: महाराष्ट्राचा सुपुत्र आणि जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा फडकवणारा उंच उडीपटू सर्वेश कुशारे याला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६' च्या क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

lmoty-2026-Sarvesh-Kushare-awarded-lokmat-maharashtrian-of-the-year-in-Sport-field | LMOTY 2026: नाशिकच्या लेकाची उंच उडी! सर्वेश कुशारेला लोकमतकडून क्रीडा क्षेत्रात मानाचा पुरस्कार

LMOTY 2026: नाशिकच्या लेकाची उंच उडी! सर्वेश कुशारेला लोकमतकडून क्रीडा क्षेत्रात मानाचा पुरस्कार

महाराष्ट्राच्या मातीतील कर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६' या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राचा सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय उंच उडीपटू सर्वेश कुशारे याला क्रीडा क्षेत्रातील विशेष योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागातून आलेल्या एका तरुणाने जागतिक स्तरावर मारलेली ही झेप महाराष्ट्रातील हजारो नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. सर्वेशच्या या यशाचे कौतुक करताना मान्यवरांनी त्याला आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' लाईव्ह:

नाशिकपासून ५० किमी अंतरावर असलेल्या देवगावसारख्या छोट्या गावातून सर्वेशचा प्रवास सुरू झाला. सरावासाठी प्रॅक्टीस मॅट्स किंवा सुविधा नव्हत्या, तेव्हा त्याने मक्याचा भुसा आणि जुन्या कपड्यांपासून तयार केलेल्या मॅटवर सराव सुरू केला. मात्र, त्याने जिद्द सोडली नाही आणि प्रयत्न सुरूच ठेवले. आज जगातील सर्वोकृष्ट ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या सर्वेशचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते, ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. 

दरम्यान, २०२५ मध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारणारा सर्वेश हा पहिला भारतीय उंच उडीपटू आहे. त्याने या स्पर्धेत २.२८ मीटरची ऐतिहासिक उडी घेत जगातील अव्वल खेळाडूंमध्ये सहावे स्थान पटकावले होते. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय उंच उडीपटू ठरला होता. त्यानंतर सर्वेशने २०२३ च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक आणि २०१९ च्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून आपली छाप पाडली.

Web Title : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर 2026 में नाशिक के सर्वेश कुशारे सम्मानित

Web Summary : नाशिक के ऊँची कूद के खिलाड़ी सर्वेश कुशारे को खेल में योगदान के लिए लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर पुरस्कार मिला। साधारण शुरुआत से आगे बढ़कर, उन्होंने वैश्विक सफलता हासिल की, जिससे महाराष्ट्र के एथलीटों को प्रेरणा मिली। वह विश्व एथलेटिक्स चैंपियनशिप के फाइनल में पहुंचने वाले पहले भारतीय ऊँची कूद के खिलाड़ी हैं।

Web Title : Nashik's Sarvesh Kushare Honored at Lokmat Maharashtrian of the Year 2026

Web Summary : Sarvesh Kushare, a high jumper from Nashik, received the Lokmat Maharashtrian of the Year award for his contributions to sports. Overcoming humble beginnings, he achieved global success, inspiring athletes across Maharashtra. He is the first Indian high jumper to reach the World Athletics Championships final.