शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

LMOTY 2024: प्रफुल्ल पटेल निकाल लागलाय, नो टेंशन; एकनाथ शिंदेंची नार्वेकरांच्या निर्णयावर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 8:24 PM

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024 Eknath Shinde Speech: महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणारा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुरू आहे.

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: राष्ट्रवादीतील आमदार अपात्रतेच्या याचिकांवरील निकालानंतर आज लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकत्र आले होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी पटेल यांना उद्देशून निकाल लागलाय, नो टेंशन, असे स्मितहास्य दिले. यावेळी शिंदे यांनी आपल्यालाही हा पुरस्कार मिळाला होता, अशी आठवण ताजी केली. 

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणारा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुरू आहे. यावर उपस्थितांना संबोधित करताना शिंदे म्हणाले की, हा पुरस्कार देणे म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव करणे, अशा पुरस्कारामुळे उर्जा मिळते. आणखी काही लोक समाजात चांगले काम करू लागतात. म्हणून अशाप्रकारचे कार्यक्रम आवश्यक आहेत. शाहु, फुले, आंबेडकरांचा वारसा लाभलेला आहे. विविध भागात प्रसिद्धी पासून दूर, पडद्यामागे काम करणाऱ्यांना शोधून त्यांना पुरस्कार देण्याचे काम लोकमतने केलेले आहे. 

जेव्हा जेव्हा अनेक प्रसंग येतात, कोरोना सारखा प्रसंग आला, जेव्हा जेव्हा समाजाला गरज असते तेव्हा लोकमत पुढे असते. केवळ वाईट गोष्टींवर टीका न करता लोकमतने चांगले काम करणाऱ्यांना प्रसिद्धी मिळवून दिली आहे. गेट वे ऑफ इंडियावर एवढा मोठा कार्यक्रम होतोय ही खूप चांगली बाब आहे, असे शिंदे म्हणाले.

 मला देखील एकदा लोकमतने हा पुरस्कार दिला होता. दिल्लीत कार्यक्रम होता. अर्थमंत्री सीतारमन यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. कोरोना काळात चांगले काम केल्यामुळे पुरस्कार दिला होता. मी छोटा कार्यकर्ता होतो. राज्यसरकारच्या माध्यमातून सर्वांगिन विकासाचे काम करतोय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपूर-मुंबई काम सुरु झाले. रेकॉर्ड टाईममध्ये समृद्धी महामार्गाचे काम पुर्ण केले. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन आहे. मोदींचेही महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे. परदेशी गुंतवणुकीत देखील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. डबल इंजिनचे सरकार वेगाने काम करत आहे, असे शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPraful Patelप्रफुल्ल पटेलlokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024Rahul Narvekarराहुल नार्वेकर