शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

LMOTY 2019: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 8:39 PM

जगातील सर्वात उंच पुतळा असा लौकिक असणाऱा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'सह शेकडो पुतळे घडवणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यावर्षीच्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुंबई - जगातील सर्वात उंच पुतळा असा लौकिक असणाऱा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'सह शेकडो पुतळे घडवणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यावर्षीच्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुधवारी मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे झालेल्या कार्यक्रमात राम सुतार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराचं हे सहावं वर्षं आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावेळी राम सुतार यंनी मूर्तिकलेच्या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाचा गौरव म्हणून त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

राम सुतार यांनी १९४७ साली बॉडी बिल्डरचा पहिला पुतळा बनवला. आपल्याच शाळेसाठी १९४८ साली महात्मा गांधीजींचा पुतळा बनवला. तेथून त्यांचा शिल्पकलेचा प्रवास सुरू झाला. जोशी सरांनी त्यांना मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेण्याविषयी सुचविले, शिवाय त्यांची राहण्याची व उदरनिर्वाहाची सोयही करून दिली. त्यांनी सुवर्णपदकही मिळविले. 

महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकारने रशिया, मलेशिया, इंग्लंड अशा विविध देशांना महात्मा गांधीजींचा पुतळा भेट दिला. गांधीजींचे भारतासह जगभरात बसविलेले जवळपास ३५० पुतळे राम सुतार यांनी साकारले आहेत. दिल्ली विमानतळावर बसविण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, तसेच सरदार वल्लभभार्इंचा सरदार सरोवर येथे साकारण्यात येणारा ८५ फूट बेस व ५२२ फूट उंचीचा सर्वांत मोठा पुतळा बनविण्याचे काम सुतार यांच्याकडेच आहे. अरबी समुद्रात साकारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामही त्यांच्याकडेच आहे. 

संसद परिसरात १६ पुतळे

राम सुतार यांनी चंबळच्या देवीची मूर्ती साकारली होती. ही मूर्ती पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना इतकी आवडली की, त्यांना भाक्रा नानगल धरणावर ब्राँझचा पुतळा बनवण्यास सांगितले; मात्र काही कारणामुळे हा प्रकल्प अपूर्ण राहिला. त्यानंतर सुतार यांनी संसदेच्या आवारात बसविण्यात आलेले शिवाजी महाराज, महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, महात्मा फुले, अशा थोर विभूतींचे जवळपास १६ पुतळे बनवले.   

राम सुतार यांनी साकारलेली महत्त्वाची शिल्पे 

- संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) असे अनेक पुतळे राम सुतार यांनी घडविले आहेत. 

- छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची शिल्पंही त्यांनी घडवली आहेत. 

- फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या देशांमध्येही राम सुतार यांनी साकारलेली शिल्पं पाहायला मिळतात. 

- रवीन्द्रनाथ टागोर यांचा टोकियोतील पुतळा राम सुतार यांनी तयार केला आहे. 

- ९३व्या वर्षीही पायाडावर उभे राहून शिल्पांना आकार; राम सुतार यांचे मोठेपण.

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Maharashtraमहाराष्ट्र