शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Gandhi Jayanti Live Updates : मोदी उद्योगपतींची चौकीदारी करतात; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 16:41 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंती आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.

वर्धा - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंती आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ऐतिहासिक बैठक सेवाग्राम येथे होणार आहे. या बैठकीला सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे उपस्थित आहेत. या बैठकीसह दिवसभर भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या बैठकीनंतर झालेल्या भाषणात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. राफेल विमान खरेदी, शेतकऱ्यांच्या समस्या, रोजगार, भ्रष्टाचार, उद्योगपतींना दिली जाणारी कर्जमाफी यावरुन राहुल यांनी मोदींवर कडाडून टीका केली. 

LIVE UPDATES -- शेतमालाला योग्य दर मिळण्याचं मोदींचं आश्वासन हवेत विरलं- राहुल- मोदींनी आश्वासनं पाळली नाहीत- राहुल- राफेल खरेदीवरुन जोरदार टीका- अनिल अंबानींकडे विमान निर्मितीचा अनुभव नाही- राहुल- पीएम भाषणातून जातीय तेढ निर्माण करतात; राहुल गांधींचा आरोप- अंबानींनी कोणत्या विमानाची निर्मिती केली?- राहुल- मोदींनी जनतेच्या खिशातला पैसा अंबानींना दिला- राहुल- लाल किल्ल्यावरुन मोदींनी देशाचा अपमान केला- राहुल- मोदींनी तुम्हाला काळ्या पैशाविरोधात लढण्यासाठी रांगेत उभं केलं, त्यावेळी श्रीमंत उद्योगपती कुठे होते- राहुल- तुमच्याकडचा पैसा मोदींनी हिसकावून घेतला- राहुल- नोटाबंदीनंतर बँकांसमोरील रांगेत किती सूटबूटवाले होते, नीरव, ललित, माल्ल्या रांगेत दिसले का?- राहुल- मोदी चौकीदार नव्हे भागीदार- राहुल - मोदी उद्योगपतींची चौकीदारी करतात- राहुल- तरुणांना फुकटात काही नको, त्यांना रोजगार हवा- राहुल- राहुल गांधींच्या भाषणाला सुरुवात

- वर्धा - राहुल गांधी यांच्या पदयात्रेला सुरुवात, काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी

- वर्धा - राहुल गांधी, सोनिया गांधींसह काँग्रेस नेत्यांनी स्वत:चं ताट स्वत: धुतलं

- वर्धा - जेवण झाल्यानंतर सर्वांनी आपापली भांडी घासली. 

- वर्धा - विशेष व्यक्तीसाठी जेवनात उकडलेली भाजी, वरण,भात, साधी पोळी, दही, खजूर व बर्फी अशी व्यवस्था करण्यात आली होती. तर अन्य नेत्यांसाठी झुणका भाकर, ठेचा, गुळाचा दलीया, दही, खांडवी, कटलेट, ढोकळा, दही वडा, खिचडी अशी व्यवस्था आहे.

- वर्धा - आश्रमातील कार्यक्रम संपल्यानंतर राहुल गांधी, सोनीया गांधी,डॉ. मनमोहन सिंग व अन्य जेष्ठ नेत्यांसाठी  जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

- वर्धा - आश्रम परिसरात राहुल गांधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

- वर्धा : महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर प्रार्थनेला सुरुवात

- वर्धा : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे बापुकुटी येथे दर्शन घेत आहेत. 

- ठाण्यामध्ये भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे  'मूक आंदोलन'  

- वर्धा : सेवाग्राम आश्रमात राहुल गांधी यांचे आगमन झाले.

ठाणे : महात्मा गांधी जयंती निमित्त ठाण्यात  रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत लायन्स क्लब ठाणेचे सदस्य,  शिवसमर्थ विद्यालयाचे आणि शारदा विद्यालयाचे सुमारे 400 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. 

- देशात जे वातावरण आहे ते घबराटीचे आहे. आज महात्माजींच्या विचारांची गरज आहे. हा संदेश काँग्रेस सेवाग्राम मधून देईल - अहमद पटेल

पुण्यामध्ये भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे  'मूक आंदोलन'  

- पुणे : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन येथील गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष वंदना चव्हाण, अंकुश काकडे आदी उपस्थित होते. 

- जळगाव : गांधी जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे अहिंसा सद्भावना शांती यात्रा. 

जळगाव : केवळ शस्त्रामुळे नव्हे तर आपल्या आधुनिक जीवनशैलीमुळे हिंसा वाढली आहे. कदापी विश्वास बसणार नाही मात्र ५२ टक्के वन्यजीव नष्ट झाले आहेत. विनाशहोणार नाही याची काळजी घ्या. महात्मा गांधी यांचे विचार आचरणात आणावेत, असे आवाहन रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त सोनम वांकचुक यांनी गांधी दिनानिमित्त जळगावात गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांनी केले. 

- जळगाव : गांधी जयंतीनिमित्त रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त सोनम वांगचुक यांनी संवाद साधला.

- वर्धा : पदयात्रेत खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, जि. प. अध्यक्ष नितिन मडावी, जि. प. उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, वरधेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प.उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकुर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाचे  पदाधिकारी आणि कार्यकर्ता सहभागी झाले होते.

- वर्धा : सेवाग्राम येथील हुतात्मा ते वर्धा येथील सिव्हिल लाईन परिसरातील महात्मा गांधी पुतळा अशी ही पदयात्रा काढण्यात आली. 

- वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना भारतीय जनता पक्षाने आज पदयात्रा काढून अभिवादन केले. या पदयात्रेचे नेतृत्व अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

- मुंबई - महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माजी उप मुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील ,सुनील तटकरे ,धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांचे मंत्रालयाशेजारील गांधीजींच्या पुतळ्याजवळ 'मूक आंदोलन' सुरू.

- सेवाग्राम : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बापू कुटीचे दर्शन घेतले.

- सेवाग्राम : युवक काँग्रेस ने लावलेले देश का चौकीदार चोर है लिहिलेले होर्डिंग पोलिसांनी जप्त केले.

- नागपूर : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांची दक्षिण पश्चिम नागपुरात पदयात्रा, शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग

 

 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूरJalgaonजळगावMumbaiमुंबईthaneठाणेPuneपुणे