पुण्यामध्ये भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे  'मूक आंदोलन'  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 10:33 AM2018-10-02T10:33:02+5:302018-10-02T10:34:48+5:30

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन येथील गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले.

mahatma gandhi 150th birth anniversary NCP agitation against BJP government in pune | पुण्यामध्ये भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे  'मूक आंदोलन'  

पुण्यामध्ये भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे  'मूक आंदोलन'  

पुणे : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडूनपुणे स्टेशन येथील गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष वंदना चव्हाण, अंकुश काकडे आदी उपस्थित होते. 

सत्य, अहिंसा, शांती ही गांधीजींची तत्वे होती तर असत्य, हिंसा, अशांती ही सत्ताधारी पक्षाची तत्व असल्याची टीका यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाच्या तत्वांची उदाहरणे सुद्धा यावेळी देण्यात आली. यात सरकारकडून सांगण्यात आलेले असत्य म्हणजे, राफेल विमान बनविण्याची एच ए एल कंपनीची क्षमता नाही. हिंसा म्हणजे, विचारवंतांच्या हत्येस जबाबदार सनातन संस्थेवर अद्याप बंदी नाही. अशांती म्हणजे देशाच्या संविधानाचा अपमान करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात आली नाही असे एका फ्लेक्सच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्याचबरोबर जवाब दो असे लिहून विविध प्रश्न करणारे फलक हातात धरण्यात आले होते.

तोंडावर पट्टी बांधून मूक आंदोलन यावेळी करण्यात आले. शांततेत कुठलेही भाषण न करता हे आंदोलन करण्यात आले. स्मरण महात्म्याचे... मूक आंदोलन जनसामान्यांचे... अशी टॅग लाईन यावेळी देण्यात आली होती.
 

Web Title: mahatma gandhi 150th birth anniversary NCP agitation against BJP government in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.