शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सोडणाऱ्यांची यादी मोठी; पण काहींनाच झाला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 08:40 IST

अण्णा डांगे, अण्णा जोशी ते गुडधे...अनेकांनी केला रामराम

यदु जोशीमुंबई : १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यापासून बऱ्याच नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. मात्र, पक्षांतर करून त्यांना नव्या पक्षात मोठे यश वा पद मिळाल्याची उदाहरणे कमीच आहेत. पक्षातील विशिष्ट नेत्यांबाबत नाराजी व्यक्त करून बाहेर पडणे हे आजचे नाही. यापूर्वीही तसे घडलेले आहे.पक्षांतर्गत गटबाजी, कुरघोडीचे राजकारण, काही नेत्यांना डावलले जाणे याबाबत पक्षात बरेचदा धुसफूस झाली, पण बंडाचे निशाण हाती घेत पक्षाबाहेर पडणाऱ्या नेत्यांची संख्या कमीच राहिली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर, आजवरच्या काही प्रमुख भाजप नेत्यांच्या पक्षांतराचा पट समोर आला.युती सरकारच्या काळात ग्रामविकास व पाणीपुरवठा मंत्री राहिलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत लोकराज्य हा पक्ष स्थापन केला पण तो प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. पुढे डांगे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादीने त्यांना पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी नेमले होते. मात्र, त्यांना आमदारकी वा मंत्रिपद मिळू शकले नाही.नगरसेवक ते खासदार असा प्रवास करणारे पुण्यातील निष्ठावंत नेते अण्णा जोशी हे भाजपने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने नाराज झाले आणि पुढे राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीतर्फे त्यांनी कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूकही लढली, पण ते पराभूत झाले होते. बीडचे खासदार राहिलेले जयसिंगराव गायकवाड हे एकेकाळी ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती मानले जात, पण पुढे दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाले आणि गायकवाड यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. पण काही वर्षांनी मुंडेंच्या हाकेला ओ देत ते भाजपमध्ये परतले. भाजपच्या आमदार राहिलेल्या विमल मुंदडा (केज, जि. बीड) पुढे राष्ट्रवादीत गेल्या आणि मंत्रीही झाल्या. आता त्यांच्या सूनबाई नमिता मुंदडा याच मतदारसंघात भाजपच्या आमदार आहेत.

गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी या दोन दिग्गज नेत्यांच्या वादात मुंडे बंडाचे निशाण फडकवितात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण लालकृष्ण आडवाणींसह त्यावेळच्या दिग्गज नेत्यांनी ते वादळ शमविले. मुंडे यांचे सख्खे पुतणे धनंजय यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीची वाट धरली; आज ते मंत्री आहेत. विदर्भातील ज्येष्ठ नेते प्रा.महादेवराव शिवणकर हे एकेकाळी पक्षात मोठे नाव होते. मात्र, पुढे ते पक्षात डावलले गेले. त्यांचे पुत्र विजय हे राष्ट्रवादीत गेले. त्यांनी गेल्या वर्षी तिरोडा मतदारसंघातून (जि.गोंदिया) विधानसभेची निवडणूक लढविली पण ते पराभूत झाले. महादेवराव शिवणकर आता राजकारणात पूर्वीसारखे सक्रिय नाहीत. भाजपचे आमदार, खासदार राहिलेले आणि पक्षसंघटनेत दीर्घकाळ विविध पदांवर राहिलेले भंडारा जिल्ह्यातील नेते डॉ.खुशाल बोपचे यांनीही पक्ष सोडला होता, ते राष्ट्रवादीत गेले आणि पुन्हा परतून भाजपचे आमदार झाले व पुढे पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र रविकांत (राष्ट्रवादी) यांचा तिरोडा मतदारसंघात पराभव झाला.रा.स्व. संघाची स्थापना जेथे झाली त्या नागपूर शहरात भाजपचा पहिला आमदार निवडून येण्यासाठी १९९०पर्यंत वाट पाहावी लागली. पहिले आमदार होते, विनोदगुडधे पाटील. ते १९९५ मध्येही जिंकले पण पुढे पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. ते काँग्रेसमध्ये गेले. त्यांचे पुत्र प्रफुल्ल गुडधे काँग्रेसकडून सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येतात. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांचे बोट धरून विनोद गुडधे पाटील राजकारणात आले होते. प्रफुल्ल यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढविली होती. संघ-जनसंघ-भाजप असा प्रवास केलेले मुंबईतील निष्ठावंत नेते मधु देवळेकर यांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली होती. भाजपमध्येही काँग्रेसप्रमाणेच गटबाजी फोफावली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. महाराष्ट्र भाजपच्या संस्थापकांपैकी एक असलेले प्रा.सूर्यभान वहाडणे काही वर्षे पक्षात नाराज होते पण त्यांनी पक्ष सोडला नाही.शिर्डी येथे त्यांनी बोलाविलेल्या भाजपमधील मराठा नेत्यांच्या बैठकीची मोठी चर्चा त्यावेळी झाली होती. युती सरकारच्या काळात सार्वजनिक आरोग्य मंत्री राहिलेले डॉ. दौलतराव आहेर हे पुढे राष्ट्रवादीत गेले पण पुन्हा भाजपत परतले. आज त्यांचे पुत्र राहुल हे चांदवडचे (जि. नाशिक) भाजप आमदार आहेत.

माझ्यावर दबाव नाही - रक्षा खडसेएकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे या भाजपमध्येच राहणारआहेत. खडसेंच्या निर्णयावर त्या म्हणाल्या, आजचा दिवस अत्यंत दु:खाचा आहे. बाबांनी जो निर्णय घेतला त्याचं दु:ख मलाही आहे. पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. मी भाजपकडून निवडून आली आहे. त्यामुळे मी पक्षाचे काम करणार आहे. नाथाभाऊंनी कधीही माझ्यावर मी सांगेन तेच करायचे असा दबाव टाकला नाही, असे रक्षा खडसे यांनी सांगितले.

भाजपला आत्मचिंतन करावे लागेल : सुधीर मुनगंटीवार

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडला हे धक्कादायकच आहे. पक्षासाठी निश्चितपणे चिंतनाची बाब आहे असे मला व्यक्तिगतरीत्या वाटते. ४० वर्षे त्यांनी पक्षाची सेवा केली. सच्चा राष्ट्रवादाकडून बुरखा घातलेल्या राष्ट्रवादीत ते जात आहेत. कोणत्या का असेना पण नाराजीतून ते जात आहेत हे चिंतन करण्यासारखे आहे. पक्षासाठी त्यांचे योगदान मोठेच होते, अशा शब्दांत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भावना व्यक्त केली.

ओ जानेवाले हो सके तो लौट के आनाहै कौन वहा तेरा सभी लोग है परायेपरदेस की गर्दीश मे तू खो न जाएकाँटो भरी डगर है तु दामन बचानाए जानेवाले हो सके तो लौट के आना

अशा शब्दांत मुनंगटीवार यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना परतीसाठी साद घातली खरी पण तोवर खडसेंनी परतीचे दोर कापलेले होते. शेवटी, ‘खुश रहे तु सदा ये दुवा है मेरी’ अशी सदिच्छा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :BJPभाजपाeknath khadseएकनाथ खडसेJalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस