शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

मराठ्यांप्रमाणे ओबीसींसाठीही मंत्रिमंडळाची उपसमिती; दाेन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत काय काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 06:10 IST

सगेसोयरेच्या परिपत्रकाला विरोध, उपोषणकर्त्यांना आज मंत्री भेटणार.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ओबीसी समाजाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक घेण्याचा निर्णय घेतानाच, मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याची मागणी मान्य करता येणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारने शुक्रवारी ओबीसींच्या बैठकीत मांडली.

ओबीसींच्या प्रश्नावर सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलवली होती. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, उदय सामंत, धनंजय मुंडे, अतुल सावे, गिरीश महाजन, संजय बनसोडे, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे यांच्यासह लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळही हजर होते.राज्यात मराठा समाजाला ५४ लाख कुणबी नोंदी कशाच्या आधारे दिल्या. या नोंदी ताबडतोब रद्द करण्याची प्रमुख मागणी ओबीसी शिष्टमंडळ आणि ओबीसी नेत्यांनी केली. त्यावर ही बाब तपासून कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी. ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करा, अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली. 

दाेन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत काय काय झाले?

- खोटी ओबीसी प्रमाणपत्रे कुणालाही दिली जाणार नाहीत. ती दिली असतील तर तपासली जातील.nखोटी प्रमाणपत्रे घेणे देणे गुन्हा आहे. अशी प्रमाणपत्रे घेणारे व देणारे दोघांवरही कायदेशीर कारवाई होईल.  - मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण देणार नाही, ते कायद्यातही बसणार नाही.- काही लोक ओबीसी, ईसीबीसी, ईडब्लूएस अशी वेगवेगळी प्रमाणपत्रे काढून वेगवेगळ्या ठिकाणी लाभ घेतात, त्यामुळे दाखले आधार कार्डला जोडण्याची कल्पना बैठकीत मांडण्यात आली, ती सरकारने स्वीकारली. त्यामुळे एकाच दाखल्याचा फायदा घेतला जाईल व सरकारला फसवले जाणार नाही.- मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जशी मंत्रिमंडळ उपसमिती आहे, तशी उपसमिती ओबीसी, भटक्या-विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन केली जाईल.- सगेसोयरेच्या बाबतीत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. एससी, एसटी, ओबीसींमध्ये सगेसोयरेंना दाखले देण्याबाबत सविस्तर नियमावली आहे, तशी नियमावली करण्याची मागणी.- सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सगेसोयरेबाबत प्रश्न सोडवणार.- मराठा, ओबीसी समाजावर अन्याय करणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची बैठकीत ग्वाही.- निवडणूक काळात आणि नंतर काही ठिकाणी लहान समाजांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कारवाई करण्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन.- पुणे आणि वडीगोद्रीला शनिवारी काही मंत्री जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेणार आणि उपोषण मागे घेण्याची सरकारतर्फे विनंती करणार.

शासनाकडून लेखी मिळाले नाही : हाकेवडीगोद्री (जि. जालना) : शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर राज्य शासनाने आम्हाला कोणतेही लेखी दिलेले नाही. मात्र ओबीसी आरक्षण बचावबाबत विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात चर्चा होईल. त्यानंतर आम्हाला उत्तर मिळेल, अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी मुंबईतील बैठकीनंतर दिली.

...तर सरकारला महागात पडेल : जरांगे पाटीलछत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाच्या कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी ओबीसी नेते करीत आहेत. येवल्यावाल्यांचे ऐकून जर एकही नोंद रद्द केली, तर सरकारला महागात पडेल, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारState Governmentराज्य सरकारOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण