शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जीवनशैलीत आयुर्वेद अंगीकारल्यास कर्करोग सुसह्य

By admin | Updated: November 3, 2014 04:28 IST

कर्करोगाचे निदान होताच काही जण घाबरून जातात. सुमारे ७० ते ८० टक्के रुग्णांचा कर्करोग हा बरा होऊ शकतो

मुंबई : कर्करोगाचे निदान होताच काही जण घाबरून जातात. सुमारे ७० ते ८० टक्के रुग्णांचा कर्करोग हा बरा होऊ शकतो. कर्करोगासाठी अ‍ॅलोपॅथीचे उपचार सुरू असतानाच त्याला आयुर्वेदाची जोड दिल्यास कर्करोग सुसह्य करणे सहज शक्य आहे. इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये (आयसीटीआरसी) अशी हजारो उदाहरणे पाहायला मिळतात. जीवनशैलीत बदल करून आयुर्वेदाचा अंगीकार केल्यास आरोग्य सुधारते, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी आयसीटीआरसीच्या द्विदशकपूर्ती कार्यक्रमात व्यक्त केले. कर्करोग संशोधन प्रकल्पाच्या द्विदशकपूर्तीनिमित्त कर्करोगासारख्या आजारावर भारतात वाजवी दरात उपलब्ध असलेल्या दर्जेदार आणि गुणकारी आयुर्वेदिक उपचारांची माहिती देण्यासाठी रविवारी दादरमधील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालातील सुरेंद्र गावसकर सभागृहात एक खास समारंभ पार पडला. या कार्यक्रमात आयसीटीआरसीचे संचालक डॉ. सदानंद सरदेशमुख, बॉम्बे रुग्णालयाच्या रेडिएशन आॅन्कॉलॉजीचे माजी विभागप्रमुख डॉ. अरविंद कुलकर्णी, सर्जिकल आॅन्कॉलॉजिस्ट डॉ. अनिल संगानेरिया आणि डॉ. विनीता देशमुख (आयुर्वेद) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या वेळी डॉ. सरदेशमुख म्हणाले, कर्करोग बरा करतो असे आमचे म्हणणे नाही, दावा नाही. पण या रुग्णांची जीवनशैली सुखकर होऊ शकते. कर्करोगाचे नाव ऐकल्यावर अनेकांचा थरकाप उडतो. कर्करोगाचे निदान होताच आयुष्य संपले, अशीच मानसिकता बनते. कर्करोग झालेला रुग्णदेखील आरोग्यदायी आयुष्य जगू शकतो. आयुर्वेदाप्रमाणे जीवनशैलीत केलेले बदल फायदेशीर ठरतात. डॉ. अरविंद कुलकर्णी म्हणाले की, कर्करोग हा कोणत्याही प्रकारच्या बाह्य विषाणूंमुळे होत नाही. शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होऊन, त्या दुसऱ्या अवयवांमध्ये पसरल्याने कर्करोग होतो. अशा वेळी जीवनशैलीत बदल केल्यास कर्करोगावर नियंत्रण मिळवता येते. त्यासाठी आहार, विहार, वर्तणूक, विचार या गोष्टींमध्ये बदल करणे अत्यावश्यक आहे. आयुर्वेदाचा समावेश असलेली जीवनशैली अंगीकारल्यास आरोग्यदायी आयुष्य जगता येते.कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास तो बरा होण्याची शक्यता वाढते. काही वर्षांपूर्वी कर्करोगाच्या शस्त्रक्रिया खूप व्हायच्या. मात्र आता नव्या तंत्रज्ञानामुळे कर्करोगाची शस्त्रक्रिया सुलभ बनली असल्याचे डॉ. अनिल संगानेरिया यांनी सांगितले. या कार्यक्रमाला डॉ. श्रीनिवास दातार, डॉ. प्रज्ञा उमाळे, डॉ. साबीर मुजावर, डॉ. वासंती गोडसे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)