शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

बेड न मिळाल्याने रुग्णवाहिकेतच सोडला जीव; बारा तास झिजविले रुग्णालयांचे उंबरठे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 4:06 AM

कंधार तालुक्यातील दिग्रस बु़ येथील बालाजी वसंतराव चिद्रावार (६८) यांची अँटिजेन तपासणी करण्यात आली होती.त्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतु, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी दुपारी दीड वाजता नातेवाइकांनी रुग्णवाहिकेतून त्यांना नांदेडला आणले होते.

नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ११ हजारांच्या पुढे गेल्यामुळे सर्वच रुग्णालये हाउसफुल्ल झाली आहेत़ नॉन कोविड रुग्णाला तब्बल बारा तास फिरूनही बेड न मिळाल्याने रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेतच मध्यरात्री आपला जीव सोडावा लागला़ हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री शहरात घडला.  जिल्ह्यात दररोज तीनशेहून अधिक कोरोनाबाधित आढळतआहेत. त्यातच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांत बेड मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. यात कोरोना रुग्णांबरोबर इतर आजारांच्या रुग्णांचीही ससेहोलपट होत आहे. कंधार तालुक्यातील दिग्रस बु़ येथील बालाजी वसंतराव चिद्रावार (६८) यांची अँटिजेन तपासणी करण्यात आली होती़ त्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला़ परंतु, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी दुपारी दीड वाजता नातेवाइकांनी रुग्णवाहिकेतून त्यांना नांदेडला आणले होते़शहरातील प्रत्येक रुग्णालयात ते गेले़ परंतु सर्वांनी एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगितले.शेवटी विष्णुपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेले़, परंतु या ठिकाणीही बेड मिळाला नाही़ दुपारपासून रुग्णवाहिकेत असलेले बालाजीराव वेदनेने विव्हळत होते़ शेवटी त्यांनी रात्री अडीचच्या सुमारास रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेत शेवटचा श्वास घेतला़डॉक्टरांना बोलवा हो़़़दुपारी दीडपासून रुग्णवाहिकेत असलेल्या बालाजीराव यांची प्रकृती तासागणिक ढासळत चालली होती़ त्यातच डॉक्टरला बोलवा हो़़़मला उपचाराची गरज आहे, असा टाहो ते फोडत होते़ परंतु नातेवाईकही हतबल होते़ अश्रू गाळण्याशिवाय त्यांच्याकडेही पर्याय नव्हता़

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस