शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची हत्या करणाऱ्या पोलिसाला आजीवन कारावास

By admin | Updated: August 1, 2014 01:09 IST

गर्भवती पत्नीची सिलिंंडरने ठेचून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने निलंबित पोलीस शिपायाला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) श्रीकांत अणेकर

अमरावती : गर्भवती पत्नीची सिलिंंडरने ठेचून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने निलंबित पोलीस शिपायाला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) श्रीकांत अणेकर यांनी गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. नीतेश पुंडलिक काठे (२८, आदर्श नेहरूनगर) असे आरोपीचे नाव आहे.सूत्रानुसार, नीतेश काठे हा नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत होता. त्याने नात्यातीलच मुक्ता (३३) नामक युवतीशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर तो पत्नीसह आदिवासी कॉलनीतील आदर्श नेहरूनगरात लताबाई निंभोरकर यांच्याकडे किरायाची खोली करून राहत होता. मुक्ताचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. या कारणावरून त्याने २३ मार्च २०१३ रोजी मुक्ताच्या डोक्यावर लहान सिलिंडरने जबरदस्त तीन वार केले. यामध्ये तिच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. पत्नीची हत्या केल्यानंतर तो स्वत: फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गेला. घटनेची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.या घटनेचे दोषारोपपत्र पोलिसांनी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) श्रीकांत अणेकर यांच्या न्यायालयात दाखल केले. याप्रकरणी सात साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. आरोपी नीतेश काठे याची पत्नी साडेपाच महिन्यांची गर्भवती असताना त्याने तिची निर्दयीपणे हत्या केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायाधीश अणेकर यांनी त्याला मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाकडून वकील उदय देशमुख यांनी युक्तिवाद केला. असा झाला प्रेमविवाहाचा अंतपोलीस खात्यात लागण्यापूर्वी नीतेशचे मुक्तासोबत प्रेमप्रकरण होते. तिच्याशी शारीरिक संबंधही होते. कालांतराने नीतेश पोलीस खात्यात रुजू झाला. मुक्ताने नीतेशकडे विवाह करण्याचा तगादा लावला. त्याने विवाह करण्यास नकार दिल्याने मुक्ताने पोलीस आयुक्तालयातील महिला सेलकडे तक्रार केली होती. तत्कालीन पोलीस आयुक्तांनी दोघांची समजूत घातली होती. अखेर दोघांनी विवाह केला. परंतु विवाहानंतर दोघांत खटके उडतच होते. मुक्ताचे अनैतिक संबंध असल्याचा संशय नीतेशला होता. चारित्र्यावर संशय घेऊन त्याने तिची निर्घृण हत्या केली. (प्रतिनिधी)ऐतिहासिक निर्णयआरोपीला मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याचा अमरावती न्यायालयाचा हा पहिला निर्णय आहे. त्यामुळेच हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. पायलट प्रोजेक्टमधील पहिले प्रकरणशिक्षेचे प्रमाण अधिकाधिक वाढविण्यासाठी ३० जून २०१४ रोजी पोलिसांनी समन्वय समितीचे गठन केले. या हत्याकांडापासून प्रायोगिक तत्त्वावर या प्रोजेक्टची सुरुवात झाली. निकाल लवकर लागण्यासाठी पोलिसांनी साक्षीदार न्यायालयात वेळेवर हजर केले.शिक्षेचे प्रमाण अधिकाधिक वाढविण्यासाठी पोलिसांकडून अशीच तत्पर भूमिका घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयातील विधी अधिकारी अनिल विश्वकर्मा यांनी दिली.