शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

वेदनांच्या सोबतीने आयुष्य काढायचे

By admin | Updated: October 2, 2015 03:50 IST

प्रशांत हा आमचा वंशाचा दिवा! रेल्वे बॉम्बस्फोटात नाहक बळी गेला. गेली काही वर्षे आम्ही अहोरात्र त्याच्या विरहात कशी काढीत आहोत ते आम्हालाच माहीत

लासलगाव (नाशिक) : प्रशांत हा आमचा वंशाचा दिवा! रेल्वे बॉम्बस्फोटात नाहक बळी गेला. गेली काही वर्षे आम्ही अहोरात्र त्याच्या विरहात कशी काढीत आहोत ते आम्हालाच माहीत. वेदनांच्या सोबतीने उरलेले आयुष्य कसेतरी काढायचे. अशा शब्दांत लासलगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गिरीधर बेंडाळे व आशालता बेंडाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.११ जुलै २००६ रोजी मुंबईत लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या १८९ जणांमध्ये लासलगाव येथील प्रशांत गिरीधर बेंडाळे या अभियंत्याचाही समावेश होता. लासलगावच्या अमृतनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या गिरीधर व आशालता बेंडाळे यांचा प्रशांत हा एकुलता मुलगा. प्रीती व पूनम या दोन बहिणींचा एकटा भाऊ. त्याने प्रॉडक्शन इंजिनिअर व त्यानंतर एमबीएची पदवी घेतली होती. मुंबईला हिस्सार शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये उच्च व्यवस्थापक पदावर तो कार्यरत होता. २६ जून २००६ रोजी त्याचा विवाह लीनाशी झाला होता. प्रशांतच्या विवाहानंतर त्याचे वडील गिरीधर बेंडाळे व आई आशालता बेंडाळे हे दोघेही मुलाचा संसार लावण्यासाठी ९ जुलैला गोरेगाव येथील फ्लॅटवर गेले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी विवाहाला पंधरा दिवस उलटत नाही, तोच ११ जुलै २००६ रोजी माटुंगा रेल्वेस्थानकावर सायंकाळी लोकलमधील पहिल्या वर्गाच्या डब्यात झालेल्या बॉम्बस्फोटात प्रशांतचा मृत्यू झाला. रेल्वेतील बॉम्बस्फोटाने बेंडाळे दांपत्याचा एकुलता मुलगा हिरावून नेला.