Let us have your fight as a party; Where did you get the descendant: Chandrakant Patil | तुमचा आमचा पंगा आहे तो पक्ष म्हणून; पण तुम्ही वंशजापर्यंत कुठे पोहोचलात?

तुमचा आमचा पंगा आहे तो पक्ष म्हणून; पण तुम्ही वंशजापर्यंत कुठे पोहोचलात?

ठळक मुद्देभाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका

पिंपरी: तुमचा आमचा जो पंगा आहे तो पक्ष म्हणून चालू द्या. संजय राऊत तुम्ही थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजापर्यंत कुठे पोहोचलात. त्यामुळे महाराष्ट्रात भीषण स्थिती निर्माण झाली आहे, असे म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. 
पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. तसेच, दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटण्यासाठी मुंबईत येत होत्या, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. राऊत यांच्या त्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही यावेळी पाटील यांनी केली आहे.पाटील म्हणाले, ""उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत असं संजय राऊत म्हणाले आहेत. मात्र, ते चुकून बोलले की त्यांना भ्रम होत आहे, हे कळत नाही. तुमचा आमचा जो पंगा आहे, तो पक्ष म्हणून चालू द्या. थेट तुम्ही शिवाजी महाराज यांच्या वंशजापर्यंत कुठे पोहचलात. त्यामुळे अतिशय भीषण स्थिती महाराष्ट्रात आलेली आहे. कोण काय बोलतय, काय अर्थ होत आहेत. जे आम्ही बोलत आहोत त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी जे म्हटलं आहे त्याचा मी निषेध करतो. महाराष्ट्रातील जनता शिवप्रेमी आहे, ते स्वस्थ बसणार नाहीत. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटण्यासाठी मुंबईत येत होत्या असं राऊत यांनी म्हटलं  होतं त्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही  पाटील यांनी केली.पाटील।म्हणाले , गोयल हे काही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नाहीत, ते कार्यकर्ते आहेत. ते २५ वर्षे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे संजय यांनीच केली. ते चुकीचं मत आहे असं आमचं म्हणणं नाहीह्व

Web Title: Let us have your fight as a party; Where did you get the descendant: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.