शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

बँकांनी फुगविलेल्या आकड्याची रिझर्व्ह बँकेकडे माहिती देणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 5:05 AM

व्यावसायिक बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्जदार शेतक-यांचे आकडे फुगवून सांगितले आहेत. त्यामुळे या बँकांनी आधी आणि नंतर दिलेली कर्जदारांची आकडेवारी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणून दिली जाईल...

मुंबई : व्यावसायिक बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्जदार शेतक-यांचे आकडे फुगवून सांगितले आहेत. त्यामुळे या बँकांनी आधी आणि नंतर दिलेली कर्जदारांची आकडेवारी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणून दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. महिनाभरात सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफीचा फायदा दिला जाईल; त्यानंतर ज्या बँकांनी मोठ्या प्रमाणात आधी आकडे फुगवून सांगितले आणि नंतर कमी केले त्याची शहानिशा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे व रिझर्व्ह बँकेकडे केली जाईल. मात्र, बँकांनी दिलेल्या या आकडेवारीवर विश्वास ठेवून कर्जमाफी दिली असती तर राज्यातील करदात्यांचा पैसा बोगस खात्यांमध्ये गेला असता. त्याला सरकारच्या निर्णयामुळे चाप लागल्याचाही दावामुख्यमंत्र्यांनी केला.सहकारी व व्यावसायिक बँकांनी मिळून ८९ लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असे आधी सरकारला सांगितले होते. मात्र सरकारने थेट लाभधारक शेतक-यांकडून अर्ज भरून घेणे सुरू केल्यामुळे या बँकांचे पितळ उघडे पडले व पहिल्या टप्प्यात साडेतेरा लाख कर्जदार शेतक-यांची संख्या या बँकांनी कमी केली. हे वृत्त ‘लोकमत’ने सर्वांत आधी प्रसिद्ध केले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, आज आमचे प्राधान्य कर्जमाफीला आहे. उद्या कर्जमाफीच्या पहिल्या दिवशी १० लाख शेतक-यांच्या खात्यांत कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल आणि येत्या नोव्हेंबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.पूर्वी बँका राईट आॅफ केलेली खाती दाखवत आणि कर्जमाफीचे पैसे घेत असत, मात्र ते आता शक्य होणार नाही. मुंबईतील बँकांतून कृषी कर्ज घेतलेले जे लोक खरेच बाहेर शेती करीत असतील तर त्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.पेपरतपासणी आॅनलाइनचमुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिकांची आॅनलाइन तपासणी यापुढेही सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र निकालाबाबत जे काही घडले ते वाईटच होते, अशी प्रतिक्रियासुद्धा त्यांनी दिली.सोशल मीडियाचा गैरवापरसोशल मीडियातून पंतप्रधान वा अन्य कोणावर टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे; पण सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने पोस्ट टाकणारे काही जण आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दुष्प्रचार केला जात आहे. असे प्रकार करणा-यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.अहमदनगरचा कॉन्स्टेबल हा एका राजकीय पक्षाच्या पुढा-याचा भाऊ आहे. हा पोलीस दोन महिने प्रचार करत होता. त्याचे पुरावे आहेत. पोलीस जर प्रचारात उतरून सरकारच्या विरोधात लिहायला लागले, तर कायदा-सुव्यवस्था उरणार नाही, त्यामुळे त्या पोलिसाविरुद्ध कारवाई केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.यवतमाळ जिल्ह्यात शेतक-यांचा कीटकनाशकांमुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जातील. कंपन्या आणि विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.‘मी सुप्रिया सुळेंच्या भरवशावर फिरत नाही’कोपर्डी बलात्कार व हत्याप्रकरणी एक महिन्यात निकाल दिला नाही, तर मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मी त्यांच्या भरवशावर राज्यात फिरत नाही, तर जनतेच्या भरवशावर फिरतो. अशी वक्तव्ये केल्यामुळे आरोपीला फायदा होतो. खटल्याचा निर्णय लावणे आमच्या हातात नाही, न्यायालयाच्या आहे. राजकीय फायद्यासाठी असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी