शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कोरोनाच्या काळातही ‘आरोग्य’वर कमी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 5:55 AM

विभागाचा खर्च तिसऱ्या क्रमांकावर. कोरोनाकाळात सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण हे विभाग प्राधान्याचे असतील असे सांगण्यात आले.

- अतुल कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ४६ हजारपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. मात्र आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी जो निधी मिळायला हवा होता तो मिळाला नाही आणि जो मिळाला तो देखील पूर्ण खर्च झालेला नाही. राज्याच्या एकूण बजेटच्या ३२.३१ टक्के निधी खर्च झाला असला तरी त्यातील फक्त २० टक्के रक्कम विकासकामांवर खर्च झाली आहे. यातही सार्वजनिक आरोग्य विभाग तिसऱ्या नंबरवर आणि वैद्यकीय शिक्षण, एफडीए हे विभाग नाममात्र खर्च करणारे ठरले आहेत. 

कोरोनाकाळात सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण हे विभाग प्राधान्याचे असतील असे सांगण्यात आले. पण हे दोन विभाग अजूनही प्राधान्यक्रमावर नाहीत, हेच ताजी आकडेवारी सांगते. महिला व बालकल्याण विभाग ६२ टक्के खर्च करुन पहिल्या स्थानी आहे. सहकार खाते दुसऱ्या तर आरोग्य खाते तिसऱ्या स्थानी आहे. लॉकडाऊन काळात विकासकामे बंद होती. त्याचा फायदा घेत आरोग्याची व्यवस्था मजबूत करण्याची संधी सरकारला आहे. पण त्या दृष्टीने खर्च होताना दिसत नाही.

३२,६२९.३०८कोटी रुपयेच खर्च२०२०-२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ४,८०,८६०.४४९ कोटींचा होता. प्रत्यक्षात १,७१,८२३.६७० कोटी रुपये आजपर्यंत वितरित केले गेले. यापैकी विकासकामांंसाठी फक्त ४६,६०७.६१४ कोटी रुपयांचा निधी मिळाला. बाकी सगळे पैसे पगार, व्याज, निवृत्तीवेतन व नॉन प्लॅनच्या कामांसाठी खर्च झाले. जे ४६ हजार कोटी मिळाले त्यापैकी देखील फक्त ३२,६२९.३०८ कोटीच खर्च झाले. हे प्रमाण एकूण बजेटच्या २०.४१ टक्के आहे.     - आणखी वृत्त/स्टेट पोस्ट

सरकारने कोरोनावर खर्च करण्याचे धोरण ठेवले आहे. त्यामुळे बांधकामे, किंवा तत्सम कामांवर निधी दिला गेला नाही. त्यामुळे खर्च कमी दिसत आहे. आरोग्य व वैद्यकीय शिक्षण यावर किमान ४ टक्के खर्च व्हावा हे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने विभाग काम करत आहे.अमित देशमुख, वैद्यकीयशिक्षणमंत्री

टॅग्स :Healthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस