लोकमत न्यूज नेटवर्क, बोर्डी: डहाणू उपवनसंरक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन अँड ॲनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या टीमने १२ तास शोधमोहीम राबवून दमण येथील एका इमारतीतून मंगळवारी रात्री बिबट्याला जेरबंद केले. तळमजल्यावरील मिठाईच्या दुकानातून बिबट्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्याचे प्रत्यक्षदर्शीने दमण वनविभागाला कळवले. वनविभाग आणि पोलिस, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शोधमोहीम राबवली.
दमणमध्ये वन अधिकाऱ्यांची माेहीम
वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डब्ल्यूसीएडब्ल्यूएचे हार्दिक सोनी, रेमंड डिसोझा, पूर्वेश तांडेल, एरिक ताडवाला, आचल मणियार, भावेश बाबरे, अविनाश महाडिक हे वनविभागाच्या दोन वाहनांतून सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी घटनास्थळी पोहोचले. येथील सर्व्हे करून लायन सफारीचे वेटर्नरी डॉक्टरांच्या मदतीने पाच तास शोधमोहीम राबविली. तिसऱ्या मजल्यावर अडगळीच्या खोलीत बिबट्याला गनद्वारे बेशुद्ध करण्यात आले होते. त्यानंतर, त्याला जेरबंद करण्यात आले.
Web Summary : A leopard was captured in Daman after a 12-hour search operation by forest officials and a wildlife association. The leopard was found on the third floor of a building after entering from a sweet shop. It was tranquilized and safely captured.
Web Summary : दमन में वन अधिकारियों और एक वन्यजीव संघ द्वारा 12 घंटे के खोज अभियान के बाद एक तेंदुए को पकड़ा गया। तेंदुआ एक मिठाई की दुकान से प्रवेश करने के बाद एक इमारत की तीसरी मंजिल पर पाया गया। उसे बेहोश करके सुरक्षित पकड़ लिया गया।