ठाणे - उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत असलेल्या विमान अपघातात त्यांचे सुरक्षा रक्षक पोलीस हवालदार विदीप जाधव (४३) यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी संध्या (३८), मुलगी नेत्रा (१४) आणि मुलगा अद्वैत (१०) असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ते राहत असलेल्या ठाण्यातील विटाव्या भागात शोककळा पसरली आहे.
पवार यांचा बुधवारी बारामती दौरा होता. त्यांच्यासोबत मुंबई पोलीस दलातील हवालदार जाधव यांचीही पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर (पीएसओ) म्हणून ड्युटी होती. मुंबईतून सकाळी ८:१० वाजता विमानाचे उड्डाण असल्यामुळे जाधव यांना मुंबईत ५:३० वाजता पोहोचायचे होते. ते कौटुंबिक कार्यक्रमासाठी मंगळवारी खारीगाव येथे सासरवाडीत गेले होते. तेथूनच ते बुधवारी पहाटे ४ वाजता रवाना झाले. त्यानंतर थेट त्यांच्या निधनाचीच माहिती मिळाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. जाधव हे विटाव्या येथील सूर्यानगर परिसरातील साई कृष्ण विहार इमारतीत बी-विंगमध्ये राहत होते.
मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगावचे ते रहिवासी होते. विदीप यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला. खारघर येथून त्यांची पत्नी, मुलगी तसेच विटाव्यातून आई आणि मुलगा असे संपूर्ण कुटुंब बारामतीकडे रवाना झाले. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
वडीलही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकीकडे विदीप हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पीएसओ होते. तर मुंबईतील कर्मवीर भाऊराव पाटील शाळेतून लिपिक म्हणून निवृत्त झालेले त्यांचे वडील दिलीप जाधव हे राष्ट्रवादी (अजित पवार) चे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्नी संध्या या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात औषध विभागात कार्यरत आहेत.
रुबाब दाखविला नाही विदीप हे उपमुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक असले तरी त्यांनी पदाचा रुबाब दाखविला नाही. त्यांची पोलीस अशीच ओळख होती. २००९ मध्ये मुंबई पोलीस दलात भरती झालेले विदीप हे चार वर्षांपासून पवार यांचे अंगरक्षक होते, असे त्यांचे निकटवर्तीय विजय पवार यांनी सांगितले.
Web Summary : Ajit Pawar's security officer, V. Jadhav, died in an accident en route to duty. Jadhav, a police constable, leaves behind his parents, wife, and two children. His death has brought grief to his hometown.
Web Summary : अजित पवार के सुरक्षा अधिकारी वी. जाधव की ड्यूटी पर जाते समय एक दुर्घटना में मृत्यु हो गई। पुलिस कांस्टेबल जाधव अपने माता-पिता, पत्नी और दो बच्चों को छोड़ गए हैं। उनकी मौत से उनके गृहनगर में शोक है।