शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

चासकमान डाव्या कालव्याला गळती

By admin | Updated: January 30, 2017 18:00 IST

चासकमान डाव्या कालव्यातून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होतेय

ऑनलाइन लोकमतचासकमान, दि. 30 - चासकमान डाव्या कालव्यातून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. अस्तरीकरणाचे काम न झाल्याने पाण्याची नासाडी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न येथील शेतकरी विचारीत आहेत.धरणातील पाण्याचा फायदा खेड व शिरूर या तालुक्यांना झाला आहे. गेली अनेक वर्षे डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाते; मात्र ते पूर्ण क्षमतेने सोडले जात नाही. कारण या कालव्याचे अस्तरीकरणच झालेले नाही. जर पूर्ण क्षमतेने पाणी सोडले, तर कालवाफुटीची शक्यता आहे. वेळोवेळी असे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे कालव्यातून पाणी जरी सोडले, तरी शिरूर तालुक्यात जाण्यासाठी मोठा कालावधी लागतो.यादरम्यानच्या काळात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती होते. त्यामुळे परिसरातील अनेक जमिनींत पाणी साचून त्या नापीक झाल्या आहेत. तर काही भागात घरांच्या भिंती सातत्याने ओलसर असतात. यामुळे अनेक कुटुंबांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच डाव्या कालव्यावर अनेक गावांच्या वस्त्यांना जाणाऱ्या मार्गावर लोखंडी पूल टाकण्यात आले आहेत. मात्र ते नादुरुस्त होऊन धोकादायक बनले आहेत. गरज नसताना सोडले पाणीया वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने जलसाठ्याची परिस्थिती समाधानकारक आहे. रब्बी हंगामात दुसऱ्या आवर्तनाची मागणी नसतानाही पाणी सोडल्याने उन्हाळ्यातील आवर्तनाची मागणी वाढली, तर ते सोडले जाणार आहे. त्यामुळे धरणांतर्गत गावांचा उन्हाळ्यातील पाणी समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. दुसरे आवर्तन सोडू नये, अशी मागणी खेड तालुक्यातील जनतेने करूनही प्रशासनाने हे गांभीर्याने घेतले नाही. आता डाव्या कालव्यातून ५० दिवस पाणी सुरू राहिल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होणार आहे. प्रशासन डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आवर्तनाबाबत निर्णय घेताना विश्वासात घेत नाही. त्यामुळे पाणी नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रशासनाला गांभीर्य नाही.अशोक नाईकरे, सरपंच (कमान)या भागातील वाड्यावस्त्यांना जोडणारे पूल धोकादायक झाले आहे. या पुलाची वेळोवेळी दुरुस्ती करण्याची मागणी करून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.बाळू राऊत, सरपंच (मोहकल) अनेक वर्षांपासून माझ्या शेतात येणाऱ्या पाण्यामुळे पिके घेता येत नाहीत. जमीन नापीक झाली आहे. शासनाने नुकसानभरपाई देणे आवश्यक असताना दिली जात नाही. त्यामुळे शेतकरीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना दुसरीकडे मोलमजुरी करावी लागत आहे.ज्ञानेश्वर विश्वनाथ नाईकरे, शेतकरीपरिसरातील पिके काढणीला आली आहेत. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज नसताही पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.मारुती सहाने, उपसरपंच (कान्हेवाडी)आवर्तन सोडल्यामुळे ऐन उन्हाळ्यात धरणात पाणी शिल्लक राहते की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कैलास मुन्ना नाईकडे, उपसरपंच (कडधे)पुढील आवर्तन सोडताना चासकमान डाव्या कालव्याचे अस्तरीकर व योग्य नियोजन करून सोडावे.रितेश मुळूक, सरपंच (आखरवाडी)