शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 20:09 IST

Maharashtra Assembly Election 2024: मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावं यासाठी केलेलं उपोषण स्थगित केल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आज परिवर्तन महाशक्ती आघाडीतील नेत्यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये परिवर्तन महाशक्तीच्या रूपात तिसरी आघाडी आकारास येत आहे. या आघाडीमध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षासह राज्यातील अनेक छोटेमोठे पक्ष सहभागी झाले आहे. दरम्यान, परिवर्तन महाशक्ती आघाडीतील घटक पक्षांचे नेते मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी जवळीक साधताना दिसत आहेत. कालच मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावं यासाठी केलेलं उपोषण स्थगित केल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आज परिवर्तन महाशक्ती आघाडीतील नेत्यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे  मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या नेत्यांमध्ये स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि प्रहारचे बच्चू कडू यांचा समावेश आहे. 

परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनीही राज्यातील २८८ जागांवर उमेदवार देण्याचे संकेत दिले होते. आता या भेटीगाठींमुळे मनोज जरांगे पाटील हे परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांना पाठिंब्याबाबत काही निर्णय घेतात का पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRaju Shettyराजू शेट्टी