सीईटी अर्ज करण्याची शेवटची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 04:08 AM2020-09-05T04:08:58+5:302020-09-05T04:09:15+5:30

सीईटी सेलमार्फत विविध १२ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या आॅनलाइन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ७ ते ८ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Last chance to apply for CET exam | सीईटी अर्ज करण्याची शेवटची संधी

सीईटी अर्ज करण्याची शेवटची संधी

Next

मुंबई : सीईटी परीक्षा १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान घेणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केल्यानंतर सीईटी सेल प्रशासन नियोजनाला लागले आहे. जे विद्यार्थी २०२० - २१ च्या आॅनलाइन सीईटी परीक्षेकरिता या आधी अर्ज करू शकले नाहीत त्यांना सीईटी सेलकडून पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे.
सीईटी सेलमार्फत विविध १२ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या आॅनलाइन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ७ ते ८ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणून आॅनलाइन अर्ज करण्याची विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी असेल, असेही सेलने स्पष्ट केले.

Web Title: Last chance to apply for CET exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.