साखरपा: संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दख्खनजवळ आज सकाळी पुन्हा दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूंनी पाच यंत्राच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
गेले पाच दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कटाई करण्यात आलेल्या डोंगरामुळे राहिलेल्या डोंगराचा भाग सतत कोसळत आहे. आज सकाळी आंबा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सततच्या पावसामुळे दरड बाजूला हटविण्यास अडथळा येत आहे. तहसीलदार व पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, दरड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.