शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

लांडे, जगताप तूर्तास राष्ट्रवादीपासून दूर

By admin | Updated: September 15, 2014 23:29 IST

अपक्ष आमदार विलास लांडे व लक्ष्मण जगताप विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावडय़ा सोमवारी दिवसभर उठल्या.

पिंपरी : अपक्ष आमदार विलास लांडे व लक्ष्मण जगताप विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावडय़ा सोमवारी दिवसभर उठल्या. मात्र, दोन्ही आमदारांनी तूर्तास असा कोणताच निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले. पक्षाने कमिटमेंट द्यावी, तरच पक्षप्रवेशाचा निर्णय घेऊ, अशी त्यांची भूमिका आहे. 
सोमवारी मुंबईत दोन्ही आमदार अन्य अपक्ष आमदारांबरोबर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असेही मेसेज मोबाईलव्दारे वेगाने फिरत राहिल्याने उत्सुकता ताणली गेली होती. परंतु दोन्ही आमदारांच्या वेगळ्या भूमिकेमुळे ती उत्सुकता फोल ठरली. 
सध्या प्रवेश केलेला नाही. परंतु पक्षाकडून ‘कमिटमेंट’ मिळाल्यास निर्णय घेता येईल. काही अडचणी आहेत, त्या दूर होणो आवश्यक वाटते. त्यावर राष्ट्रवादीकडून काय तोडगा निघतो, यावरच पुढील निर्णय अवलंबून आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे वेळ मागून घेतला आहे, असे आमदार लांडे यांनी सांगितले. जगताप यांच्या निकटवर्तीय कार्यकत्र्यानीही या मुद्दय़ास दुजोरा दिला. 
भोसरीचे आमदार लांडे यांचे प्रतिस्पर्धी स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. नगरसेवक दत्ता साने यांनीही तयारी केली आहे. 
अशा परिस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतल्यास लांडगे यांची बंडखोरी पक्ष रोखणार का?, साने यांची समजूत कशी काढणार? या मु्द्यांवर तोडगा कसा काढला जाणार? याची कमिटमेंट लांडे यांना पाहिजे. 
चिंचवड मतदारसंघ आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला मिळणार की काँग्रेसकडे जाणार, हे निश्चित नाही. अशा स्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची घाई करणो अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीेच राहील, बंडखोरी होणार नाही, याची ‘कमिटमेंट’ जगताप यांना पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हमी मिळाल्यानंतरच पक्ष प्रवेश करायचा,असा निर्धार करून त्यांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ हे धोरण स्वीकारले आहे. (वार्ताहर)