शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

10 लाखांच्या कर्जासाठी चार लाख गमावले, नातेवाईकांकडूनही घेतले कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 22:25 IST

दहा लाखांचे कर्ज झटपट मिळवण्याच्या नादात एका महिलेने आपले चार लाख रुपये गमावले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

नागपूर : दहा लाखांचे कर्ज झटपट मिळवण्याच्या नादात एका महिलेने आपले चार लाख रुपये गमावले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. टिना प्रभूदयाल उईके (वय २८) असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. त्या रमाईनगरात राहतात. १ सप्टेंबरला त्यांनी एका हिंदी दैनिकात जाहिरात वाचली. केवळ मार्कशिटच्या आधारावर कर्ज दिले जाते, असे या जाहिरातीत नमूद होते.वृद्ध आईवडिलांच्या उपचारासाठी टिना यांना १० लाखांची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी जाहिरातीत नमूद असलेल्या ८९५५२ ६३०५३, ९३५२१ ७८५९७, ९३५१३ ६८५६, ९३०९४६४७०६ आणि ९३१४८४४७९७ या मोबाईल क्रमांकांवर १ सप्टेंबरपासून संपर्क केला. आरोपींनी सहजपणे दहा लाखांचे लोन मंजूर करून देण्याची बतावणी केली. त्यानंतर वेगवेगळ्या वेळी विविध कारणे पुढे करून टिना यांना त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात रक्कम जमा करायला लावली. टिना यांचे आजारी वडील सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या खात्यात पेंशनची काही रक्कम होती. ही रक्कम काही दागिने आणि नातेवाईकांकडून उधार घेऊन दहा लाखांचे कर्ज मिळवण्याच्या नादात टिना यांनी आरोपींच्या खात्यात ३ लाख, ९० हजार, ९०० रुपये जमा केले. आता मिळेल, उद्या कर्जाची रक्कम मिळेल या आशेवर असलेल्या टिना यांना आरोपींनी कर्जाची रक्कम दिली नाही.उलट ते प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून रक्कम मागत होते. दुसरीकडे चार-आठ दिवसांच्या मुदतीवर नातेवाईक, ओळखीच्यांकडून रक्कम घेतली परंतू चार आठवड्यांपेक्षा जास्त अवधी होऊनही त्यांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे घेणेक-यांनीही टिनामागे तगादा लावला. दोन्हीकडून कोंडी झाल्यामुळे रडकुंडीला आलेल्या टिना यांनी बुधवारी जरीपटका पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.तेल गेले, तूप गेले अन् ...साधारण कुटुंबातील गृहिणी असलेल्या टिना यांनी आईवडीलांच्या काळजीतून कर्जाची रक्कम घेण्यासाठी हा सर्व प्रकार केला. त्यांना कर्ज तर मिळालेच नाही. उलट वृद्ध वडीलांच्या खात्यात असलेली सर्वच्या सर्व रक्कम ठगबाजांच्या हातात गेली. आप्तस्वकीयांचे कर्जही झाले. आता ते कसे परत करायचे, असा प्रश्न टिना यांना पडला आहे.

टॅग्स :bankबँक