Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहिणींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 10:13 IST2025-10-22T10:11:53+5:302025-10-22T10:13:53+5:30
Ladki Bahin Yojana : यंदा लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे. कारण भाऊबीजेआधीच त्यांना खूशखबर मिळाली आहे.

Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहिणींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
महायुती सरकारने घोषित केल्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा रंगली आहे. सुरुवातीपासूनच या योजनेवर विरोधक सडकून टीका करत असले, तरी महायुतीसाठी ही योजना गेमचेंजर ठरल्याचं विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळालं. यानंतर या योजनेची छाननी सरकारकडून सुरू करण्यात आली. याच दरम्यान आता ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
यंदा लाडक्या बहिणींची दिवाळी आणखी गोड होणार आहे. कारण भाऊबीजेआधीच त्यांना खूशखबर मिळाली आहे. लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता हा पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे. लाभार्थी बहिणींची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार कार्डची पडताळणी करण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागाने या संदर्भातील आदेश जारी केले. मात्र आता 'ई-केवायसी'ची प्रक्रिया तूर्तास थांबविली आहे.
e-KYC कशी करायची?
Ladki Bahin Yojana e-KYC करण्यासाठी काही सोप्या प्रक्रिया करता येऊ शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वेबसाईटला भेट द्या.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभर्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा. यानंतर नवीन वेबपेज ओपन होईल.
- e-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा, तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या. कॅप्चा कोड नोंदवल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या.
- आधार प्रमाणीकरण संमती मधील मजकूर वाचून सहमत आहे, या पर्यायावर क्लिक करा. यानंतर ओटीपी पाठवा हा पर्याय निवडा, यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल.