Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खूशखबर, या तारखेला मिळणार फेब्रुवारी महिन्याचे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:23 IST2025-03-03T13:22:36+5:302025-03-03T13:23:31+5:30

Ladki Bahin Yojana March Month Instalment: फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने,योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. 

Ladki Bahin Yojana: Good news For Ladki Bahin, on this date you will get the money for the month of February and March | Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खूशखबर, या तारखेला मिळणार फेब्रुवारी महिन्याचे पैसे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खूशखबर, या तारखेला मिळणार फेब्रुवारी महिन्याचे पैसे

Ladki Bahin Yojana Update: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यास सुरुवात केली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने, तसेच योजनेसाठी पात्र आणि अपात्र महिलांची छाननी सुरू झाल्याने योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. या महिन्यांच्या  १५०० रुपयांची रक्कम ८ मार्च रोजी म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या संदर्भातील माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

अदिती तटकरे यांनी सांगितले की, ८ मार्च रोजी शनिवार असला तरी त्या दिवशी महिला दिनानिमित्त विधिमंडळाचं विशेष सत्र आयोजित करण्यात आलं आहे. तसेच  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे. यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाईल. 

रम्यान, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी वित्त विभागाकडून  निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसा देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता महिला दिनी दोन्ही हप्ते एकत्र मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Ladki Bahin Yojana: Good news For Ladki Bahin, on this date you will get the money for the month of February and March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.