एकनाथ शिंदेंची नक्कल पडली महागात! कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंना विधान परिषदेचे समन्स; उद्या हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:35 IST2026-02-04T18:32:42+5:302026-02-04T18:35:14+5:30

Kunal Kamra Parody Song Action Vidhan Parishad: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या विडंबन गाण्याप्रकरणी कुणाल कामरा आणि त्याचं समर्थन करणाऱ्या सुषमा अंधारेंना उद्या विशेषाधिकार समितीसमोर हजर राहावे लागणार आहे.

Kunal Kamra Parody Song: Eknath Shinde's imitation cost him dearly! Kunal Kamra and Sushma Andhare summoned by Legislative Council; ordered to appear tomorrow | एकनाथ शिंदेंची नक्कल पडली महागात! कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंना विधान परिषदेचे समन्स; उद्या हजर राहण्याचे आदेश

एकनाथ शिंदेंची नक्कल पडली महागात! कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंना विधान परिषदेचे समन्स; उद्या हजर राहण्याचे आदेश

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (तत्कालीन मुख्यमंत्री) एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी आणि विडंबन गाणे तयार केल्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरा याच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीने कुणाल कामरा आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांना समन्स बजावले आहे.

मार्च २०२५ मध्ये कुणाल कामरा याने एका स्टँड-अप शो दरम्यान 'दिल तो पागल है' या गाण्याच्या चालीवर एक विडंबन गाणे तयार केले होते. या गाण्यातून त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर 'गद्दार' अशी टीका केली होती. या कृत्याबद्दल भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. सुषमा अंधारे यांनी या गाण्याचे आणि कामराचे समर्थन केल्यामुळे त्यांनाही या प्रकरणात घेण्यात आले आहे.

विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी सांगितले की, कामरा आणि अंधारे यांना १५ दिवसांपूर्वीच नोटीस पाठवण्यात आली होती. आता त्यांना उद्या, गुरुवार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर ते हजर राहिले नाहीत, तर समिती त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेऊ शकते.

कुणाल कामराच्या या पॅरोडी गाण्यामुळे यापूर्वी मोठा वाद झाला होता. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तो ज्या स्टुडिओमध्ये शूट झाला होता, तिथे तोडफोडही केली होती. आता हे प्रकरण विधान परिषदेच्या समितीपर्यंत पोहोचल्याने पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध विशेषाधिकार असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

Web Title : कुणाल कामरा की एकनाथ शिंदे मिमिक्री: विधान परिषद का समन जारी

Web Summary : हास्य कलाकार कुणाल कामरा और सुषमा अंधारे को एकनाथ शिंदे का मजाक उड़ाने पर विधान परिषद का समन। पैरोडी गीत से विशेषाधिकार हनन का नोटिस। गैरहाजिरी पर सख्त कार्रवाई हो सकती है।

Web Title : Kunal Kamra's Eknath Shinde Mimicry: Summons Issued by Legislative Council

Web Summary : Comedian Kunal Kamra and Sushma Andhare face Legislative Council summons for mocking Eknath Shinde. A parody song led to privilege breach notice. Non-attendance may result in strict action.