शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेचे पाणी मुंबईला नेणार : वायकर

By admin | Updated: February 2, 2015 23:56 IST

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

पाटण : ‘इंग्रजांच्या काळात १७० किलोमीटरची जलवाहिनी टाकून मुंबईला पाणीपुरवठा केला होता. तर मग कोयना धरणातील पाणी मुंबईला का जाऊ शकत नाही? त्यासाठी भविष्यात पाठपुरावा करून कोयनेचे पाणी मुंबईला नेणार आहे,’ अशी माहिती गृहनिर्माण, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान राज्यमंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली.दौलतनगर,मरळी, ता. पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.वायकर म्हणाले, ‘कोयना धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती करून उरलेले पाणी नदीत सोडले जाते. हे पाणी वाया जात आहे. दुसरीकडे चिपळूणमधील अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. अशा गावांना कोयनेच्या पाण्याचा लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्राध्यापकांची संख्या कमी पडत आहे. तासिका धर्तीवर अनेकजण कमी पगारात काम करत आहेत. राज्यातील औद्योगिक वसाहतीत अनेक यंत्रणा पडून आहेत. बाजारात कुशल कामगारांचा पुरेसा संख्याबळ असताना अशा यंत्रणा व गुंतवणुकीचा प्रत्यक्ष वापर झाला पाहिजे.’ ‘महिलांना पन्नास टक्के राखीव जागा असल्याच पाहिजेत, हे शिवसेनेचे धोरण आहे. प्राथमिक शिक्षण विभाग माझ्या ताब्यात नसला तरी वीस पटांखालील शाळा बंद करणे, शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार कोणत्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे व प्राथमिक शिक्षण विभागाचे सचिव यांच्याशी चर्चा करणार आहे.’ (प्रतिनिधी)